दोन दुचाकी वाहनांची एकमेंकांना समोरासमोर धडक! संपूर्ण जखमी
सुनिल गेडाम सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही : एकीकडे संपूर्ण तालुक्यात धुलिनंदन साजरा होत असतांना सायंकाळ च्या सुमारास मौजा मेंढा (माल ) च्या समोर दोन दुचाकी एकमेकांना आदलळ्या त्या त्यामध्ये दोन्ही दुचाकी वरील सहा जण जखमी झाले, जखमी मध्ये ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे,मिळालेल्या माहिती नुसार मौजा कोळसा (पांगडी) येथील रहिवासी सचिन शेडमाके वय वर्ष अंदाजे ३५ वर्ष हा आपल्या पत्नी व ३ वर्षाच्या मुलीला घेऊन नागभीड इथे आपल्या दुचाकी वाहन क्रं MH 34 CC 2011
याने जात होता, तर विरुद्ध दिशेने मौजा पळसगाव (जाट ) कडून आपल्या स्कुटी या क्रं MH 34 CC 9623
या वाहनाने ट्रिप्पल सीट वैष्णवी अशोक सावसाकडे वय वर्ष २२ हेटी वॉर्ड सिंदेवाही,डिम्पल गुरनुले २० वर्ष सिंदेवाही ख़ुशी कृपा उंदीरवाडे वय १९ ह्या तीन मुली येत होत्या मौजा मेंढा(माल) च्या समोर गाडीवरून नियंत्रण सुटल्याने एकमेंकांना जाऊन धडकल्या,त्या मध्ये ३ वर्ष्याच्या मुलींसह सर्व च जखमी झाले आहेत वृत्त लिहत पर्यंत गंभीर जखमी असल्याने सर्वाना चंद्रपूर ला रेफर केले होते,
*सिंदेवाही पोलीस विभागाची कर्तव्यदक्षता*
या अपघाताची माहिती मिळताची पी एस आय सागर महल्ले,सहकारी
रणधीर मंदारे, विनोद बावणे व इतर कर्मचारी घटना स्थळी दाखल होऊन जखमी ना रुग्णवाहिकेची वाट न बघता आपल्या गाडीत आणून ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही मध्ये भरती केले, पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सतत तालुक्यात पेट्रोलिंग करून कुठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी सकाळ पासून दुचाकी वर ट्रिप्पल सीट जाणाऱ्या च्या दुचाकी पोलीस स्टेशन ला जमा करीत होते तरी पण पोलीस प्रशासन व कायाद्याला न जुमानता भरधाव वेगाने गाडी चालवून अपघात ला आमंत्रण दिले.