मंगोलियात उलानबातर येथे आयोजित युएनसीसीडी सीओपी17 या कार्यक्रमात भारताने भूमी पुनर्संचय आणि दुष्काळविरोधी प्रतिकारशक्ती यांसाठी वैविध्यपूर्ण, पुरेशा,पूर्वानुमानित आणि शाश्वत आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठ्याचे केले आवाहन
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ‘सुपीक जमीन आणि दुष्काळविरोधी प्रतिकारशक्ती’ या विषयावरील मंत्रीस्तरीय चर्चेत बोलताना, भारताने उभारलेल्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा यंत्रणा तसेच वैविध्यपूर्ण वित्तसहाय्य विषयक संरचना यांच्यावर अधिक भर दिला. मंगोलियात उलानबातर येथे आयोजित वाळवंटीकरण रोखण्यासंदर्भातील संयुक्त राष्ट्रांच्या करारावर (युएनसीसीडी)आधारित 17 व्या परिषदेत (सीओपी17) ते बोलत होते. भूमी पुनर्संचयासाठी […]

