भिक्खू आणि तपस्वी.

धार्मिक बातमी
Share

भिक्खू आणि तपस्वी.

 

• भिक्खू म्हणजे तपस्वी काय? याचे उत्तर ‘नाही’असे आहे.
• स्वतः भगवंतांनीच निग्रोध या नावाच्या परिव्रजकाबरोबर झालेल्या संवादात या प्रश्नाचे नकारात्मक उत्तर दिले आहे.
• एकदा भगवंत राजगृहजवळील गृध्रकूटावर राहत होते. त्यावेळी उदुंबरीका राणीच्या उद्यानामध्ये राहणाऱ्या पुष्कळशा परिव्रजकामध्ये निग्रोध नावाचा एक परिव्रजक होता.
• त्या सुमारास भगवंत गृध्रकूटावरून उतरून सुमगंधा नदीच्या काठावर, ज्या ठिकाणी मोरांना दाणे घालीत तिथे मोकळ्या हवेत येरझारा करीत होते. त्यावेळी निग्रोधाने भगवंतांना येरझारा घालताना पाहिले. तेव्हा तो आपल्या परिव्रजक अनुयायांना म्हणाला, “कृपा करून शांत रहा.श्रमण गौतम सुमगंधेच्या तीरावर आहेत.” त्यांच्या सांगण्यावरून सर्व परिव्रजक स्तब्ध राहिले.
• नंतर भगवंत परिव्रजक निग्रोधाजवळ गेले, निग्रोध त्यास म्हणाला, “भगवंत, या. मी आपले स्वागत करतो. आपण येथे आगमन करण्याचा निश्चय करण्यापूर्वी पुष्कळच विचार केला असावा. या इथं सिद्ध असलेल्या आसनावर बसावे.”
• पुढे केलेल्या आसनावर भगवंत स्थानापन्न झाले. निग्रोध भगवंतापेक्षा एका ठेंगण्या आसनावर त्यांच्याच बाजूला बसला.
• नंतर निग्रोध भगवंतांना म्हणाला, “श्रमण गौतम आमच्या ह्या चमुत आले आहेत.म्हणून मी त्यांस एक प्रश्न विचारतो,भगवंतांचा धर्म काय? आपल्या शिष्यांना ते काय धर्मविनय शिकवितात? आणि असे भगवंतांनी आत्मसुखप्राप्ती शिकविलेले शिष्य कशाला शरण जातात? त्यांच्या सदाचरणाची मुख्य तत्व कोणती?”
*🔹( संदर्भ-भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, लेखक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, पान नं.३२६.)*🔹

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत