(प्रफुल मेश्राम – तालुका प्रतिनिधी)
चंद्रपूर/चिमूर- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जवनोन्नती अभियान, तालुका व्यवस्थापन कक्ष प. स. चिमूर जील्हा चंद्रपूर अंतर्गत मासड सी एल एफ महिला फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड ही कंपनी गेल्या 2 वर्षापासून तळागाळातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा याच उद्देशाने कार्यरत आहे. व्यापारी गावामध्ये येऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव देत नाही. व्यापाऱ्यांना माहीत असते की शेतकऱ्याला पैशाची गरज असते त्या मुळे शेतकरी कमी किमतीमध्ये आपले धान्य विकतो याचास फायदा व्यापारी वर्ग घेत असतो. तळागाळातील शेतकऱ्यांची फसवणूक परत व्हावी नाही याचेस भान ठेवून. कंपनीने या वर्षी पण शेतकऱ्यांना योग्य हमी भाव देऊन शेतकऱ्यांकडून धान खरेदी सुरू केली आहे. आज दिनांक 8 डिसेंबर 2023 रोज शुक्रवार ला कंपनीने तळोधी ना. या गावातून शालु शुभास मेश्राम या महिला शेतकऱ्यांचा योग्य हमी भाव देऊन धान खरेदी केला. हा धान खरेदी करतांना कंपनीचे सी ई ओ श्री. शुभम रामटेके सर, सी आर पी माधुरी सहारे मॅडम, कंपनी चे लेखापाल प्रफुल मेश्राम सर उपस्थित होते.

