विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद .

सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न

चंद्रपूर जिल्हा
Share

सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर संपन्न

विजयदुतांनी सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे सेवक बनून कार्य करावे- मा.विजयभाऊ वडेट्टीवार
विजयभाऊ जनसेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार जलद .
ब्रम्हपुरी :- राज्याचे विरोधी पक्षनेते,सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून सर्व सामान्य,गोर-गरिब जनतेचे शासकीय किंवा अशासकीय कामे सोयीचे व्हावे याकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजय विजयभाऊ जनसेवा केंद्राची स्थापना होणार आहे करिता विजयदूत स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ही जनसेवेची कामे पार पडणार आहेत,आज मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय, सावली येथे विजयदूत स्वयंसेवक यांची कार्यशाळा व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर पार पडले*
*गावपातळीवरील सर्वसामान्य माणसांना शासकीय कामासाठी वारंवार शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात, नागरिकांना शासकीय योजनांविषयी माहिती नसल्याने ते शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहतात, ही बाब जाणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसांची कामे जलदगतीने पुर्ण झाली पाहिजे. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ सहजतेने मिळाला पाहिजे या उदात्त हेतूने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतुन सावली तालुक्यातील विधानसभेच्या ३ बूथामागे एक विजयदूत ठेवण्यात आला असून विजयभाऊ जनसेवा केंद्र उभारून त्याठिकाणी विजयदुतांची नियुक्ती केली आहे. हे विजयदूत नागरिकांना शासकीय व इतर कामांसाठी मदत करणार आहेत. विजयभाऊ जनसेवा केंद्रापर्यंत जे वृद्ध, अपंग व आजारी व्यक्ती पोहचू शकत नाही अशा व्यक्तींच्या घरी स्वतः जाऊन विजयदुत सेवा देणार आहेत.*
*सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर मा.दिनेश पाटील चिटणूरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,महिला तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर,माजी पंचायत समिती सभापती सावली मा.विजय कोरेवार,माजी सभापती पंचायत समिती सावली मा.राकेश पाटील गड्डमवार,सावली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चूदरी,सावली तालुका युवक काँग्रेसअध्यक्ष मा.किशोर कारडे,युवक शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तिवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी तसेच गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,पदाधिकारी,महिला आघाडी,युवा आघाडी नवनियुक्त विजयदूत,कार्यकर्तागणं मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.विजय कोरेवार यांनी तर आभार प्रदर्शन जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी केले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत