राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबीर

चंद्रपूर जिल्हा
Share

तालुका प्रतिनिधी. चंदन पाटील 

  आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर अंतर्गत ग्रामपंचायत कोलारा येथे ग्रामविकास व मतदार जनजागृती युवाशक्ती या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण समाजकार्य श्रमसंस्कार विशेष शिबीर.
दिनांक 24 जानेवारी 2024 ते 30 जानेवारी 2024 दरम्यान ग्रामपंचायत कोलारा येथे आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील एम एस डब्ल्यू विद्यार्थ्यांचे शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन 25 जानेवारी 2024 रोजी शिबिर उद्घाटन समारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य वाळस्कर मॅडम उद्घाटक म्हणून माननीय दशरथजी कुडमेथे उप आयुक्त अप्पर आयुक्त कार्यालय आदिवासी विभाग नागपूर विशेष अतिथी म्हणून माननीय किशोर घाडगे प्रमुख प्रमुख अतिथी सरपंच शोभा कोचाडे मॅडम तसेच गावातील सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर खंगार सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कोमल वंजारी यांनी केले तसेच शिबिराच्या माध्यमातून गावातील व्यक्तींना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अशाच प्रकारे दिनांक 24 ते 30 जानेवारी 2024 यादरम्यान या दरम्यान विविध मार्गदर्शकांची मार्गदर्शने तसेच शिवार फेरी स्वच्छता सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कार्य करण्याचे कार्य आठवले समाजकार्य महाविद्यालय बऱ्याच वर्षापासून करीत असल्याचे दिसून येतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत