बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक दिला वनविभागाच्या ताब्यात – ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

महाराष्ट्र
Share

बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी अवैध लाकुड वाहतूक करणारा ट्रक दिला वनविभागाच्या ताब्यात –

ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

 

जळगाव ता.बोदवड:–महाराष्ट्र राज्यातुन मध्य प्रदेशात अवैध प्रकारे लाकुड वाहतूक करणारा ट्रक बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आसने व चेतन तायडे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिला.
सविस्तर वृत्त असे की दि.26 रोजी रात्री 9.00 च्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आसने व चेतन तायडे हे दोन्ही घरी जात असताना ट्रक क्रमांक MP.09 KC.4331 यामध्ये अवैध प्रकारे लाकुड वाहतूक होत असल्याची शंका आल्याने सदर या ट्रक ला थांबविण्यात आले,त्यानंतर ट्रक चालक यांना वाहतूक पास बद्दल विचारले असता वाहतूक पास नसल्याचे,व वनविभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे सांगितले,सदर हि माहिती वनविभागाला दुरध्वनी द्वारे कळविले असता, साधारंणता 20 ते 25 मिनिटांत वनविभागाचे वनरक्षक श्री.मनोज वंजारी,दोन वनमजूर आले,सदर ट्रक ची पाहणी केली असता अवैध प्रकारे लाकुड वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले,व त्यांनी साळशिंगी येथील प्रादेशिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोप वाटिका येथे लावण्यात आला.
लाकुड वाहतूक करणारा हा ट्रक वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.
सदर दि.27 रोजी वनपाल श्री.उमाकांत कोळी,वनरक्षक सौ.रूपाली शिर्के यांनी या अवैध लाकुड वाहतूक करणाऱ्या ट्रक चा पंचनामा करण्यात आले आहे,या ट्रक मध्ये अंदाजे 10 घनफुट मिटर ओले निम,पंचराऊ असे आढळून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत