मजूर हजेरी पत्रकाविना सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम…! कोलारी/पट येथील प्रकार, ग्रामपंचायतीसह पंचायत समिती प्रशासन निद्रिस्त

महाराष्ट्र
Share

मजूर हजेरी पत्रकाविना सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम…!

कोलारी/पट येथील प्रकार

ग्रामपंचायतीसह पंचायत समिती प्रशासन निद्रिस्त

लाखनी :- (कालिदास खोब्रागडे) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल अथवा कुशल काम सुरू करण्यापूर्वी पंचायत समितीच्या मग्रारोहयो विभागातील संगणक परिचालकडून ऑनलाईन मजूर हजेरी पत्रक तयार करून नंतरच काम सुरू करावे. असा नियम असला तरी यास कोलारी/पट ग्रामपंचायतीने तिलांजली देऊन मजूर हजेरी पत्रकाविना मागील ३ दिवसापासून सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम सुरू केले असल्याचे वास्तव समोर आले असल्याने नियमबाह्य काम करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे.
ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध व्हावा. या करिता केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली असून राज्यात ती महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असल्याने नियोजन, सनियंत्रण व देखरेखीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे असून ग्रामसेवकाचे मदतीला रोजगार सेवकाची ग्रामसभेतून निवड करण्यात आली आहे. यात ६० टक्के अकुशल(मजूर प्रधान) तर ४० टक्के कुशल(बांधकाम) चे प्रावधान आहे.
कोलारी/पट ग्रामपंचायतीत प्रमोद गाढवे ते केवळ हेमने यांचे घरा पर्यंत सांडपाण्याची व्यवस्था व्हावी. या करिता नाली बांधकाम केले गेले नव्हते. त्यामुळे त्या परिसरातील वास्तव्यास असणाऱ्यांच्या जाण्या येण्याच्या रस्त्यावर सांडपाणी साचून आवागमन करतांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे. सांडपाणी साचून राहिल्याने डासांची पैदास होऊन साथीच्या रोगांची शक्यता नाकारता येत नव्हती. ग्रामपंचायतीचे मागणी वरून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. ग्रामपंचायती मार्फत हे नाली बांधकाम सुरू असले तरी या नाली बांधकामावर कार्यरत मजुरांचे मागील ३ दिवसापासून मजूर हजेरी पत्रक तयार केले गेले नसल्याचे वास्तव समोर आल्याने नियमबाह्य काम करणाऱ्या ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकारी काय कारवाई करतात. याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया/स्टेटमेंट(चौकट)
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मौजा कोलारी येथे सिमेंट काँक्रिट नाली बांधकाम सुरू आहे. या बांधकामावरील कार्यरत मजुरांचे हजेरी पत्रक तयार करण्यात आले किंवा नाही. या बाबद मला काहीही माहिती नाही.
सुधाकर कांबळे, तांत्रिक अधिकारी(कृषी)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत