भारतीय मजदूर महासंघ संलग्न बांधकाम कामगार संघ यांची बैठक संपन्न झाली .
जळगाव.: बांधकाम कामगार संघटना यांच्या बैठकीत कामगारांना येणाऱ्या अडचणी तसेच ऑनलाइन मध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी व लागणारे साहित्य याबाबत प्रदेश अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. लवकरात लवकर जळगाव जिल्ह्यात भारतीय मजूर संघाचे प्रश्न लवकर मार्गी लावू असे आश्वासन दिले. या मीटिंग चे प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हरिजी चव्हाण व मा श्रीपाद कुटासकर साहेब व प्रदेश उपाध्यक्ष सदाशिव बाबा सोनार, माजी जिल्हाध्यक्ष पी जे आप्पा पाटील ,भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव सचिन भाऊ लाड वंजारी, बांधकाम विभाग जिल्हा सचिव सुनील कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट ,विज्ञान पाटील ऐंरंडोल ,राजू महाजन विजय सूर्यवंशी ,संतोष दांडेकर असे बरेच सभासद उपस्थित होते.

