लीगल एड क्लीनिक लकडगंज नागपूर च्या पुढाकारने जुडले पुन्हा एक घर
नागपूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर च्या माध्यमातून लकडगंज पोलीस स्टेशन नागपूर येथे जिल्हा सचिव मा.श्री सचिन पाटील यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या लीगल एड क्लीनिक च्या माध्यमातून (नावं बदललेले ) सौ. सोनू आणि श्री. मोनू यांचा वाद क्लीनिक मध्ये आला होता. या दोघांना लीगल क्लीनिक मध्ये मार्गदर्शन करण्यात आले. त्यानुसार दोघांन मध्ये असलेला वाद होता तो क्लीनिक मध्ये 4 वेळेच्या मार्गदर्शनातून दोघांची मतभेद मिटला आणि सौ. सोनू आणि श्री.मोनू आपल्या घरी खुशीने नांदायला जाण्याचा निर्णय घेतला
लीगल एड क्लीनिक लकडगंज चे वकील जयश्री हेडाऊ आणि PLV मुकुंद अडेवार ,यांनी मार्गदर्शन केले व हा वाद येथेच मिटविला.

