सर्व शासकीय कार्यालयांमध्ये माहीती अधिकार दिन साजरा करण्यात यावा
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयाला माहिती अधिकार महासंघाकडून निवेदन
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी
चंद्रपूर : माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे.

आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सष्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र.३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक :२० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर प्रश्नमंजूषा,,चर्चासत्र, व्याख्यानमाला इत्यादी विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. या शासन निर्णयाची या वर्षी आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी.

माहीती अधिकार दिन सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्यात यावा या सठी माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर व जिल्हा परिषद चंद्रपूर दयानंद नागरकर, हिमाऊ अली, पंचशील वाळके, अजय कासवटे, संबा मोरे, नूर मोहम्मद शेख, योगेश झाडें या सह मोठ्या संखेने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

