नविन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाचे उपमुख्यमंत्री फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते आज भूमीपूजन
नागपूर : नागपूरच्या प्रशासकीय सुविधेत भर घालणाऱ्या नविन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमीपूजन 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी संपन्न होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय सुविधेचा आदर्श मापदंड ठेवणाऱ्या या इमारतीची रचना केली गेली आहे. सर्व सामान्य मानसांना जिल्हा व विभागीय पातळीवरील प्रशासकीय कामासाठी जर यावे लागले तर त्यांना आपले प्रशासन वाटावे व त्यात अधिक सुलभता राहावी याला या नविन इमारतीत प्राधान्यक्रम देण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. या इमारतीला प्रशासकीय मान्यता गतवर्षी प्राप्त झाली. त्यानंतर कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे जबाबदारी सुपूर्द करण्यात आली. सुमारे 271.34 कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या नविन इमारतीत विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय नागपूर शहर याचबरोबर इतर शासकीय कार्यालयही राहणार आहेत.
00000

