धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शहरात वाहनांसाठी पार्किंग स्थळ निश्चित  याच जागेवर वाहने पार्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्हा
Share
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शहरात वाहनांसाठी पार्किंग स्थळ निश्चित
 याच जागेवर वाहने पार्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर -15 व 16 ऑक्टोबर 2024 रोजी होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभुमी येथील समारंभास उपस्थित राहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनुयायी / नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी, समारंभास येणा-या अनुयायांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, तसेच प्रवेश व निर्गम याचे विनियमन करण्याकरीता चंद्रपूर शहर आणि बाहेरून येणा या वाहनांकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी 15 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजतापासुन 17 ऑक्टोबरचे सकाळी 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील खालील नमुद स्थळे सर्व वाहनाकरीता “पाकींग स्थळ” म्हणून घोषित केले आहे.
1. नागपूर रोडने दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) शकुंतला लॉन ब) जनता कॉलेज पटांगण क) जनता कॉलेज समोरीत ईदगाह मैदान.
2. शहरातून दिक्षाभुमी कडे येणा-या वाहनांकरीता : अ) सेंट मायकल स्कूल मैदान ब) सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक) क) न्यु इंग्लीश ग्राऊंड
3. वडगाव, आकाशवाणी व लगतच्या परीसरातून दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयमच्या मागे) ब) जिवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे)
4. मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परीसरातून येणा-या वाहनांकरीता : अ) कृषि भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टैंड.
May be an image of 1 person and smiling

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत