1993 च्या तुकडीचे एजीएमयुटी केडरचे सनदी अधिकारी विक्रम देव दत्त यांनी कोळसा सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला

राष्ट्रीय
Share

1993 च्या तुकडीचे एजीएमयुटी केडरचे सनदी अधिकारी विक्रम देव दत्त यांनी कोळसा सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला

विक्रम देव दत्त यांनी आज कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला. अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (एजीएमयुटी) कॅडरचे 1993 च्या तुकडीचे सनदी अधिकारी,  विक्रम देव दत्त यांनी यापूर्वी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) महासंचालक म्हणून काम केले आहे.

याआधीचे कोळसा मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांथा राव यांच्या जागी दत्त यांनी पदभार स्वीकारला असून, कांथा राव सध्या खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. तर राव यांच्या आधी अमृत लाल मीना कोळसा मंत्रालयाचे सचिव होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत