20 जानेवारी 2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आमरण उपोषण (गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले)

महत्वाची बातमी
Share

20 जानेवारी 2025 पासून विभागीय आयुक्त कार्यालय छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आमरण उपोषण

गंगाखेड प्रतिनिधी

बाळासाहेब जंगले

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील भ्रष्टाचारा विरोधात विभागीय आयुक्त कार्यालय छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दिनांक 20 जानेवारी 2025 पासून बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येणार आहे.
तरी मराठवाड्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या *जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावातील जे तक्रारी असतील त्या तक्रारी आपल्या लेटर पॅड वर विभागीय आयुक्त कार्यालय छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पाठवावे* त्या तक्रारीची प्रशासनाने जर दखल नाही घेतल्यास दिनांक 20 जानेवारी 2025 पासून छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे होणाऱ्या उपोषणा मध्ये स्वतः सामील व्हावे व आपल्या सोबत आपले पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांना घेऊन आमरण उपोषणामध्ये सामील व्हावे.
*संपूर्ण मराठवाड्याच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या घेऊन एकच मंडप मध्ये सर्व पदाधिकारी उपोषणास बसतील*

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत