ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन आंबेडकर चौकाचे कठडे तुटले
संविधानाची प्रतिकृती थोडक्यात वाचली
गंगाखेड प्रतिनिधी
बाळासाहेब जंगले
रेल्वे गेट जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील असलेल्या संविधानाची प्रतीकृती असलेल्या वट्यावर ऊसाची ट्राॅली पलटल्यामुळे कठडा तुटुन चौकाचे नुकसान झाले.
या विषयी अधिक माहिती अशी की शहरातील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोर उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या पलटी झाल्याची घटना ताजी असतांना रविवार २९ डिसेंबर रोजी दुपारी ०३ ते ३:-३० च्या दरम्यान उसाने भरलेल्या दोन ट्राली पैकी एका ट्राॅलीचा राॅड तुटल्याने अकोली रेल्वे फाटकावरून मागे परत आलेली ऊसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पुन्हा पलटी झाल्याची घटना घडली
शहरातील कोद्री रस्त्याने साखर कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला डबल हेड लावून वाहतूक करतांना संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोरील चढ असलेल्या रस्त्यावर दोरखंड तुटल्याने मागे आलेल्या ट्रॅक्टरच्या ऊसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या मंगळवार २४ डिसेंबर रोजी दुपारी च्या सुमारास पलटी झाल्या होत्या. यात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नव्हती. त्याच घटनेची पुनरावृत्ती रविवार २९ डिसेंबर रोजी दुपारी अंदाजे ३ ते ३:-३० वाजेच्या सुमारास झाली. यात कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्च्या ऊसाने भरलेली ट्रॉली संविधान चौकाच्या कठड्यावर पलटी झाल्याने कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात संविधानाची प्रतिकृती थोडक्यात बचावली. याची माहिती समजताच आंबेडकरी कार्यकत्यांनी चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
फाटकावरून परत मागे आल्याली एक ट्रॉली संविधान चौकाच्या कठड्यावर कोसळली. ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने संविधान चौकाच्या कठड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलीस ठाण्यासमोरच उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याचे समजताच गंगाखेड चे पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सपोनि शिवाजी सिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, व्यंकट गंगलवाड, जमादार संभाजी शिंदे, दिपक व्हावळे, गणेश चनखोरे, वाहतूक शाखेचे वैजनाथ आदोडे ,शंकर गयाळ आदींनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. सदरील घटना समजताच उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे,न.प.चे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, स्वच्छता विभागप्रमुख शिवाजी हजारे जालिंदर गायकवाड,यांनी येवुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकाची पाहणी करुन चौकाचे लगेच काम चालू करण्याचे आदेश देवुन काम सुरू करण्यात आले.


