एसटी महामंडळाच्या पाच हजार बसेस भंगारात
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) मागील पाच वर्षांमध्ये पाच हजार बसेस भंगारात.
भंगारात निघालेल्या बसेस तुलनेत नवीन बसेस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) मागील पाच वर्षांमध्ये पाच हजार बसेस भंगारात निघाल्या आहेत. भंगारात निघालेल्या बसेस तुलनेत नवीन बसेस उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. हळू- हळू बसेस कमी होण्यासह एसटीच्या प्रवासी सेवेतील अडचणींबाबत आपण जाणून घेऊ या.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) २०१८- १९ दरम्यान १६ हजार ४१४ बसेस प्रवासी सेवेत होत्या. ही संख्या २०२२- २३ मध्ये घसरून १३ हजार ३१६ बसेसपर्यंत खाली आली. त्यामुळे बसेसची संख्या कमी होतांना दिसत आहे. तर ३१ मार्च २०२० दरम्यान एसटीच्या १ हजार ५८६ बसेस भंगारात निघाल्या. ३१ मार्च २०२१ मध्ये ९२९ बसेस, ३१ मार्च २०२२ मध्ये ७५२ बसेस, ३१ मार्च २०२३ मध्ये ५७९ बसेस तर ३१ मार्च २०२४ दरम्यान तब्बल १ हजार १२९ बसेस भंगारात निघाल्याची माहिती माहिती सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकार कायद्याव्दारे प्राप्त झाली.
दरम्यान जुन्या बसेस भंगारात निघत असताना नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात फारशा न आल्याने महामंडळातील बसेसची संख्या घसरली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी संचालक मंडळाची नागपुरात बैठक घेतली. यावेळी त्यांनी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात ३ हजार ५०० बसेस दाखल होणार असल्याचा व ईव्ही बसेस व भाडेतत्वावरीलही अनेक बसेस मिळणार असल्याचा दावा केला होता. यावर आता महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. मागील दोन वर्षांत घोषित नवीन बसेस गेल्या कुठे, असा या संघटनेचा प्रश्न आहे.