धरणगाव तालुक्यातील बाबोरी बुद्रुक गावात प्रजासत्ता दिन 76 व वर्षाच्या मोठ्या उत्साहात साजरा.
ऐंरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील

धरणगाव तालुक्यातील बाबोरी ग्रामपंचायतीत प्रजासत्ता दिन 76 व वर्षाच्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सरपंच कमलबाई धनराज भिल ध्वजारोहण केले. सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळी सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित असताना ध्वजारोहण कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत व ध्वजारोहण गीत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केले . शाळेच्या मुलींनी सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाचे शोभा वाढवली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते , ग्रामपंचायत सदस्य ज्योती बाई माळी . सुनंदाबाई पाटील. नरेश पाटील. कालिदास सोनवणे. गोपाल मरसाळे.
यावेळी सूत्र संचालन मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री आत्माराम माळी सर यांनी केले.श्री प्रेमराज परशुराम पाटील. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धरणगाव,शिवदास रामदास पाटील. पंचायत राज जिल्हा सह.संयोजक जळगाव,
प्रवीण शिरसाट भारतीय मजदुर संघ बांधकाम विभाग जिल्हा सचिव यांनी पर्यावरण सुरक्षा , व कामगारांच्या योजना बाबत मार्गदर्शन केले, कार्यक्रमात .माजी विद्यार्थी उपस्थित होते.

