व्हॉट्सअॅपद्वारे नोटीस पाठवण्यास मनाई
नवी दिल्ली : पोलीस आरोपीला
फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) किंवा भारतीय नागरिक्त सुरक्षा संहिता (बीएनएसएस), २०२३ अंतर्गत व्हॉट्सअॅप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे नोटीस बजावू शकत नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. ‘सीआरपीसी’ चे कलम ४१ अ किंवा ‘बीएनएसएस’ चे कलम ३५ अंतर्गत केवळ कायद्याने परवानगी दिलेल्या सेवेच्या माध्यमातूनच नोटीस बजावण्यासंबंधी पोलिसांना योग्य सूचना द्याव्यात असे निर्देश न्या. एम एम सुंदरेश आणि न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले.

