रेल्वे दुहेरीकरण बाहेरून होत असेल तर रेल्वे उड्डाणपुलाची गरज काय -खासदार संजय जाधव रेल्वे उड्डाणपुलामुळे व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल

महाराष्ट्र
Share

रेल्वे दुहेरीकरण बाहेरून होत असेल तर रेल्वे उड्डाणपुलाची गरज काय
-खासदार संजय जाधव

रेल्वे उड्डाणपुलामुळे व्यापाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल

गंगाखेड प्रतिनिधी
देवराव (बाळासाहेब) जंगले

गंगाखेड शहरातील रेल्वे गेट क्र.17 वरील कोद्री कडे जाणाऱ्या रेल्वे प्रास्ताविक उड्डाणपूल रद्द करण्यात यावा या उड्डाण पुलामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून हा उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी खा. संजय जाधव यांना सोबत घेऊन श्रीनिवास मुंडे व काही व्यापारी यांनी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नगरपरिषद विभागाअंतर्गत कामाच्या भुमी पुजन कार्यक्रमात खा.जाधव यांच्यावर टीका करीत मी हे दोन-चार व्यापाऱ्यासाठी रेल्वे उड्डाणपूल थांबवणार नाही, रेल्वे उड्डाणपूल मी करणारच असे भर सभेतून बोलून दाखवले.
या संदर्भात दिनांक 25 फेब्रुवारी रोजी शहरातील लॉजवर खा. संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन मी हा उड्डाण पुलाचा प्रश्न लोकसभेत मांडणार असून या उड्डाण पुलामुळे स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून त्यांचे कुटुंब उघड्यावर येणार आहे. येथील दुकाने उपजीविकेचे साधन असून या रेल्वे उड्डाण पुलामुळे मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून रेल्वे उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे. 2028 पर्यंत रेल्वेचे दुहेरीकरण होणार असून रेल्वे गेट क्रमांक 17 वर रेल्वे उड्डाणपुलाची आवश्यकता राहणार नाही विनाकारण श्रेय लाटण्यासाठी व स्वतःचा विकास करण्यासाठी उड्डाण पुलाच्या उभारणीचा घाट घालू नये. मी व्यापाराच्या बाजूने असून मी त्यांचा प्रश्न लक्षवेधी मध्ये मांडणार आहे असे पत्रकार परिषदेत खासदार संजय जाधव यांनी बोलताना सांगितले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मुंडे ,रिपाईचे ॲड .महावीरराजे भालेराव, विष्णू मुरकुटे, श्रीकांत भोसले, नारायण शेंडगे, गोविंद राठोड व इतर काही व्यापारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत