लॉयन्स क्लब गंगाखेड टाउनतर्फे शितल जलसेवेची सुविधा

महाराष्ट्र
Share

लॉयन्स क्लब गंगाखेड टाउनतर्फे शितल जलसेवेची सुविधा

 

गंगाखेड प्रतिनिधी 

देवराव (बाळासाहेब) जंगले 

 

येथील लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनच्या वतीने गंगाखेड शहरामध्ये शिक्षण, व्यापार खरेदी व दवाखाना इत्यादी कारणास्तव ये-जा करणाऱ्या गरजूवंत जनतेसाठी मोफत शितल जलसेवा व मोफत अल्पोपहाराची सुविधा (दिनांक 27 फेब्रुवारी बुधवार) पासून

करण्यात आली आहे. ही सुविधा राजुरकर एजन्सी दिलकश चौक बस स्टेशन रोड येथे सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वाटसरूंना शितल जल पिण्यासाठी उपलब्ध करून ही सेवा उन्हाळा संपेपर्यंत चालू ठेवण्याचा संकल्प लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन तसेच लॉ.ज्ञानेश्वर अनंतवार (माऊली राजूरकर ) यांनी केला आहे. या सेवेचे उद्घाटन गंगाखेड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लॉ.दगडूशेठ सोमानी यांच्या हस्ते करण्यात आले.या जनसेवार्थ कार्यक्रमाचे अध्यक्ष क्लबचे अध्यक्ष लॉ.गोविंद निरस तसेच कॅबिनेट ऑफिसर लॉ.केशव देशमुख,लॉ.रामेश्वर तापडिया, लॉ.प्राचार्य बालाजी ढाकणे, प्रमुख पाहुणे लॉ.संभाजी वाडेवाले क्लबचे सचिव लॉ.प्रा.डॉ.राजीव आहेरकर हे या प्रसंगी उपास्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत