नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

महत्वाची बातमी महाराष्ट्र राजकीय राष्ट्रीय सामाजिक
Share

नामवंत शिल्पकार राम सुतार जींच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

 

 Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सुतार जी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.  श्री राम सुतार जी हे एक असामान्य शिल्पकार होते. त्यांच्या शिल्पकलेमधील कुशलतेमुळेच केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशाचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या काही कलाकृती भारताला लाभल्या. भारताचा इतिहास, संस्कृती आणि एकजुटीच्या भावनेची सामर्थ्यशाली अभिव्यक्ती असलेल्या कलाकृती म्हणून त्यांच्या कलाकृतींची नेहमीच प्रशंसा होत राहील आणि या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी भावी पिढ्यासांठी राष्ट्रीय अभिमान अजरामर केला आहे. त्यांच्या कलाकृती कलाकार आणि नागरिक या दोघांनाही नेहमीच प्रेरणा देत राहतील.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः

“ श्री राम सुतार जी यांच्यासारख्या असामान्य शिल्पकाराच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. त्यांच्या शिल्पकलेमधील कुशलतेमुळेच केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीसह देशाचे सर्वोच्च मानबिंदू असलेल्या काही कलाकृती भारताला लाभल्या. भारताचा इतिहास, संस्कृती आणि एकजुटीच्या भावनेची सामर्थ्यशाली अभिव्यक्ती असलेल्या कलाकृती म्हणून त्यांच्या कलाकृतींची नेहमीच प्रशंसा होत राहील. या कलाकृतींच्या माध्यमातून त्यांनी भावी पिढ्यासांठी राष्ट्रीय अभिमान अजरामर केला आहे.  त्यांचे कुटुंब, चाहते आणि त्यांच्या महान जीवनकार्याचा प्रभाव असलेल्या सर्वांप्रति मी माझ्या संवेदना  व्यक्त करतो. ॐ शांती.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत