विद्यापीठ हिवाळी-२०२५ लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर -विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

NAGPUR
Share

विद्यापीठ हिवाळी-२०२५ लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

-विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी -२०२५ लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या https://www.nagpuruniversity.ac.in

या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील दि. १४ जानेवारी २०२६, १५ जानेवारी २०२६, १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या हिवाळी २०२६ लेखी परीक्षांचे पेपर नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे रद्द करण्यात आले आहे. परीक्षा यापूर्वीच्या नमूद केलेल्या वेळापत्रकातील वेळेनुसार नियोजित परीक्षा केंद्रावर सुधारित वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे.

सदर वेळापत्रकातील बीएससी (होम सायन्स) ३ सेम (ओल्ड), बीएससी (होम सायन्स) ५ सेम, बीएससी (फॉरेन्सिक सायन्स) ३ सेम (ओल्ड), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स) ५ सेम, बीएससी ३ सेम (एनईपी), बीएससी ३ सेम (ओल्ड), बीएससी ५ सेम, बीएससी ३ सेम (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) (ओल्ड), बीएससी ५ सेम (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए) ३ सेम (ओल्ड), बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए) ५ सेम, बॅचलर ऑफ कॉमर्स (ओबी ॲंड सीबीसीएस) ५ सेम, बॅचलर ऑफ कॉमर्स (ओल्ड) ५ सेम, बीए ३ सेम (एनईपी), बीए ३ सेम (सीबीसीएस) अँड (ओल्ड), बीए ५ सेम (सीबीसीएस) अँड (ओल्ड), बीए (रुरल सर्विस) ३ सेम (एनईपी), बीए (रुरल सर्विस) ३ सेम (ओल्ड), बीए (रुरल सर्विस) ५ सेम, मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (एमसीए) ३ सेम (न्यू अँड ओल्ड), मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (एमसीए) ३ सेम (सीबीसीएस), मास्टर ऑफ फाईन आर्ट्स ३ सेम (सीबीसीएस) (एनईपी), मास्टर ऑफ सोशल वर्क ३ सेम (सीबीसीएस)(एनईपी) अँड (ओल्ड) या परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येत असून विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात येत आहे.
यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राद्वारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्यार्थ्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री मनीष झोडपे यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत