सर्वसामान्य नागरिकाने ग्रामसभेत कोणकोणती प्रश्न उपस्थित करावी.श्री इमरान पठाण (संस्थापक/अध्यक्ष)
युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य
ग्रामसभेसाठी प्रश्नपत्रिका
१) मागील ग्रामसभेच्या इतिवृत्ताबाबत
मागील ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांची अंमलबजावणी झाली आहे का ?
कोणते ठराव आजही प्रलंबित आहेत ? त्याची कारणे काय ?
इतिवृत्तात नागरिकांनी मांडलेले सर्व मुद्दे नोंदवले आहेत का ?
२) शासन निर्णय / परिपत्रक अंमलबजावणी
मागील सहा महिन्यांत ग्रामपंचायतीला कोणते शासन निर्णय प्राप्त झाले ?
त्या निर्णयांपैकी कोणते निर्णय प्रत्यक्ष राबवले गेले ?
कोणत्या योजनांचा गावाला लाभ मिळालेला नाही व का ?
३) जमा व खर्च (2024–25) व (2025–26)
सन 2024–25 व (2025–26) चे एकूण उत्पन्न व खर्च किती आहे ?
रस्ते, पाणी, नाली, दिवे यासाठी किती तरतूद आहे ?
मागील वर्षातील निधी शिल्लक आहे का ? असल्यास किती व का ?
खर्चाची माहिती ग्रामपंचायत फलकावर लावली आहे का ?
४) “आमचा गाव – आमचा विकास” आराखडा
विकास आराखडा लोकसहभागातून तयार केला आहे का ?
नागरिकांनी सुचवलेली कामे आराखड्यात समाविष्ट केली आहेत का ?
कोणती कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत ?
५) अर्ज व तक्रारी
ग्रामपंचायतीकडे सध्या किती अर्ज प्रलंबित आहेत ?
अर्ज निकाली काढण्यास विलंब का होत आहे ?
घरपट्टी, नळ कनेक्शन, दाखले याबाबत वेळेची मर्यादा पाळली जाते का ?
६) मूलभूत सुविधा
गावातील रस्त्यांची दुरवस्था कधी सुधारली जाणार ?
पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था कधी होणार ?
बंद असलेले स्ट्रीट लाईट कधी सुरू होतील ?
कचरा संकलन व व्यवस्थापनाचा ठोस आराखडा आहे का ?
७) योजना व लाभ
घरकुल / रमाई / प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रलंबित प्रकरणे किती ?
पेंशन योजनांतील लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळतो का ?
मनरेगा कामे बंद असल्यास कारण काय ?
८) शिक्षण व आरोग्य
अंगणवाडी व शाळा नियमित सुरू आहेत का ?
पोषण आहार व शालेय सुविधा पुरेशा आहेत का ?
गावात आरोग्य शिबिर कधी आयोजित केले जाणार ?
९) पारदर्शकता व प्रशासन
सर्व विकास कामांची माहिती फलकावर का लावली जात नाही ?
कामांची मोजमाप पुस्तिका व बिल पाहण्यासाठी उपलब्ध आहेत का ?
RTI अर्जांना वेळेत उत्तर दिले जाते का ?
१०) इतर विषय
महिलांचा व युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी काय उपाय आहेत ?
तंटामुक्ती समिती सक्रिय आहे का ? नसल्यास कारण काय ?
वरील सर्व प्रश्न तुम्ही एक नागरिक म्हणून ग्रामसभेत उपस्थित करू शकता.
धन्यवाद…. 🙏
श्री इमरान पठाण (संस्थापक/अध्यक्ष)
युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य.


