काँग्रेसचे विजयी शिलेदार: जनसेवेचा नवा संकल्प!

चंद्रपूर जिल्हा
Share

काँग्रेसचे विजयी शिलेदार: जनसेवेचा नवा संकल्प!

चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक बांधवांचे आणि भगिनींचे मनापासून अभिनंदन!
जनतेने दिलेल्या या कौलाचा आदर करत, आज सर्व विजयी शिलेदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. हा विजय केवळ एका पक्षाचा नसून चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय आहे. आपल्या सर्वांच्या सोबतीने शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अभिनंदन पात्र विजयी शिलेदार:
शास्त्रीनगर प्रभाग २ मधून सचिन विनोद कत्याल, बंगाली कॅम्प प्रभाग ४ मधून संगिता मंगल भोयर, विवेकानगर प्रभाग ५ मधून सुनंदा दिलीप धोबे, वनश्री केशव मेश्राम व अभिषेक गजानन डोईफोडे, इंडस्ट्रियल इस्टेट प्रभाग ६ मधून राजेश मुरली अड्डुर, वडगाव प्रभाग ८ मधून अजय निळकंठराव बल्की, मनिषा विलास बोबळे, प्रतीक्षा अक्षय येरगुळे व प्रदीप (पप्पू) देशमुख, नगिनाबाग प्रभाग ९ मधून सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले व वैशाली अजय महाडुळे, एकोरी मंदिर प्रभाग १० मधून राहुल अरुण घोटेकर, संजिविनी राजू वासेकर व साफिया तवंगर खान, भानापेठ प्रभाग ११ मधून शिला दत्तु सिडाम, राहुल गेंदलाल चौधरी व सईदा बेगम ताजु शेख, महाकाली मंदिर प्रभाग १२ मधून करुणा शंकर चालखुरे व संगिता गोपाल अमृतकर, बाबुपेठ प्रभाग १३ मधून विनोड हरिश्चंद्र लभाने व रामनरेश कुवरलाल यादव, पठाणपुरा प्रभाग १४ मधून वसंतराव राजेश्वरराव देशमुख, वैशाली प्रकाश चंदनखेडे व सुनील गोपालदास खंडेलवाल, हिंदुस्थान लालपेठ प्रभाग १६ मधून करिश्मा बिट्टू जंगम, अनिता हनुमान चौखे व चंदा मनोज वैरागडे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग १७ मधून आकाश मिलींद मानकर व महानंदा रविंद्र वाळके.
आपल्या सर्वांच्या कार्यातून सामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत आणि चंद्रपूर शहर विकासाचे मॉडेल बनावे, यासाठी आपणा सर्वांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत