औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे द्वितीय पदवीदान सोहळा व प्रधानमंत्री रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे यशस्वी आयोजन

महाराष्ट्र मुख्यपान राजकीय संपादकीय सामाजिक
Share

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व श्री. विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून मा. मंत्री श्री. मंगलप्रभातजी लोढा, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विकास मंत्रालय व श्री. दिगंबरजी दळवी, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व आय. टी. आय. मध्ये “द्वितीय कौशल्य पदवीदान” सोहळ्याचे आज दि. १७/०९/२०२३ रोजी आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै- २०२३ मध्ये नागपुर विभागातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले या संस्थेतील जोडारी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी सौरव बाटबर्वे, यांत्रिक मोटारगाडी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी नितेश ढोंगे व जोडारी व्यवसायातील प्रशिक्षणार्थी कुंदन दुपारे यांचा नागपुर येथे श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, श्री. मंगलप्रभातजी लोढा, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता विकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे प्राचार्य श्री. सुरेश एस. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही कार्यक्रमाचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे आज दि. १७/०९/२०२३ रोजी सकाळी ७.00 वाजता प्रधानमंत्री रन फॉर स्किल मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेला मा. श्री. कृष्णाजी गजबे, आमदार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. तसेच सकाळी ११ वाजता पदवीदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मॅरेथॉन स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांचा मुले व मुली यांना प्रत्येकी अनुक्रमे ३०००/-, २०००/- व १०००/- धनराशी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थेतील व्यवसायनिहाय प्रथम तीन विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मुख्य अतिथि मा. श्री. कृष्णाजी गजबे, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते व श्री. आफताब आलम खान, ए. ए. एनर्जी लिमिटेड वडसा यांच्या अध्यक्षतेखाली प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला श्री. राजरतन मेश्राम सचिव पत्रकार क्लब, व श्री. विलासजी ढोरे जेष्ठ पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.
सन्माननीय आमदार साहेब उदघाट्नपर मार्गदर्शनात संबोधन केले की, प्रशिक्षणार्थ्यांना आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर युवकांनी निराश न होता सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. जीवनात अशक्य असे काहीही नाही. आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य विकसित करून, रोजगार व स्वयंरोजगाराची कास धरावी, असे अमूल्य प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. कृष्णाजी गजबे यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे संचालन श्री. व्ही. वाय. नागमोती व आभार प्रदर्शन श्री. सी. डी. समर्थ यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होणेकरिता संस्थेचे गटनिदेशक श्री. रविकान्त गोतमारे,श्रीमती माया जाधव श्री. के. एस. उमक, श्री. गुणवंत वांढरे, श्री. दीपक बोकडे, श्री. राकेश भोयर, श्री, टी. यू. सोयाम,श्री. बादल घरडे कु. के.पी. बोन्द्रे, श्री राहुल कराडे,श्रीमती.एन. डी. भडके, कु. एस. एस. प्रधान, व संस्थेतील इतर सर्व कर्मचारी वृंद व संस्थेतील आजी व माजी प्रशिक्षणार्थी व सुरक्षा रक्षक यांनी सहकार्य केले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत