बेमुदत धरणे आंदोलनाचा आज ६३ वा दिवस ग्रामपंचायत खडसंगीसमोर प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष सुरूच
दिनांक ०४/०९/२०२६ पासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आज ६३ दिवस पूर्ण होत आहेत. गावाच्या विकासासाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कांसाठी हा लढा सुरू आहे.
आजही अनेक महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित असून त्यावर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.
प्रलंबित प्रमुख मागण्या :
१. अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती सुरू करणे.
२. कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी तथा सचिव नियुक्त करणे.
३. चिमूर-वरोरा मार्गावरील बंद पथदिवे सुरू करणे.
४. शासकीय दूध शीतकरण केंद्राच्या भूखंडावरील अतिक्रमणाची चौकशी.
५. जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव मार्गी लावणे.
६. सन २०२० पासून प्रलंबित माहिती अधिकार अर्जांवर कायदेशीर कार्यवाही.
७. खडसंगी स्मशानभूमीचा सर्वांगीण विकास.
८. पंढरपौनी स्मशानभूमी विकास प्रस्ताव मंजूर करणे.
९. गावात नियोजनबद्ध विक्रेता क्षेत्र (Vendor Zone) निश्चित करणे.
१०. मुख्य व सार्वजनिक रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कायदेशीर कार्यवाही.
११. दिनांक २४/०८/२०२६ च्या ग्रामसभेतील ठरावांवर अंमलबजावणी.
१२. दिनांक २२/०९/२०२६ च्या ग्रामसभेतील ठरावांवर अंमलबजावणी.
१३. आंदोलनादरम्यान सादर केलेल्या सर्व निवेदनांवर व अर्जांवर कार्यवाही.
आमची भूमिका स्पष्ट आहे!
आमचा कोणत्याही व्यक्तीशी वैयक्तिक विरोध नाही. आमचा संघर्ष हा गावाच्या विकासासाठी, प्रशासकीय पारदर्शकतेसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी आहे.
प्रलंबित मागण्यांवर केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष निर्णय, लेखी आदेश आणि कालबद्ध अंमलबजावणी हवी.
✊ ६३ दिवसांचा संघर्ष सुरू आहे… न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहणार!
समस्त खडसंगी ग्रामस्थ

