विनोद काळकोपरे :- कल्याण तालुका प्रतिनिधी
माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन(महासंघ) चे ठाणे संपर्क प्रमुख विनायक चव्हाण व कल्याण शहर प्रचार प्रमुख विनोद काळकोपरे यांनी घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांची भेट . कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये अनेक समस्या आहेत याला कोणीही लोकप्रतिनिधी वाचा फोडत नाही आहे . याचे एकमेव कारण म्हणजे आता असलेले प्रशासकीय कारभार गेल्या तीन वर्षा मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये नगरसेवक नसल्याने आणि त्यांचा कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली मधील नागरिकांच्या समस्या सोडवणार तरी कोण , त्यात काय भर ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील अधिकारी स्वतःला राजा आणि नागरिकांना नोकर समजून त्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत . त्यांना जाब विचारणारे कोनि नसल्याने हम करो सो कायदा राबवित आलेत . मागील आयुक्त हि ह्या भ्रष्ट अधिकारी यांना पाठीशी घालत आलेत. आरक्षित भूखंड असताना ही नगररचना चे अधिकारी इमारती बांधकाम परवानग्या बोगस कागदपत्राच्या किलोने वाटत आलेत . या प्रकरणी अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी आयुक्तांच्या निदर्शनास ह्या गोष्टी आणून दिल्या वेळ प्रसंगी उपोषण ही केले तरी अनधिकृत बांधकाम बाबत ठोस अशी निष्काशन ची कारवाई ही सहाय्यक आयुक्त यांच्याकडून झालीच नाही .प्रशासकीय कारभार म्हणजे नक्की काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे . मग ते आरोग्य ,शिक्षण ,अनधिकृत बांधकामे ,भूमाफियांनी आरक्षित भूखंड हडपले , आरक्षित भूखंड असताना ही नगररचना विभाग इमारत बांधकाम परवानग्या कशा देतात , नागरिकांना रुग्णालयात योग्य उपचार पद्धती मिळत नाही , डी पि रोड चे सुरु असलेले नित्कृष्ठ दर्जाचे काम , महानगरपालिका शाळेच्या आजुबाजूला अतिक्रमणे झाली आहेत अशा अनेक समस्या आहेत . अशा अनेक नागरी समस्या तसेच अनधिकृत बांधकामे बाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्यासोबत चर्चा करून कारवाई करण्याबाबतचे पत्र देण्यात आले . तसेच आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात आल्या .

