सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने हभप किर्तनकारांचा नागरी सत्कार उत्साहात…………!

एरंडोल – येथे संत सावता माळी पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने सुर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था व सावित्री फुले शक्तीपीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व दशरथ कुलधरण ( संस्थापक अध्यक्ष) यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यात माळी समाजातील हभप किर्तनकारांचा पगडी,शेला, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन नागरी सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रत्येक सत्कारार्थीने संत सावता माळी यांचे अभंग सादर […]

Continue Reading

शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन; स्मारकासाठी पवित्र माती संकलित

देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे वीर जवान शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या स्मृतींना एरंडोल नगरपरिषदेतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. शहीद स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने एरंडोल येथील त्यांच्या गावातील पवित्र माती संकलित करण्यात आली. ही माती शहीद राजेंद्र धनाजी ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत संकलित करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे पाठविण्यात आली आहे. देशासाठी प्राणांचे […]

Continue Reading

पुढील महिन्यात होणार्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला गणेशोत्सव यावर्षी देखील शहरात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यासाठी तसेच गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता मनपासह नासुप्र, पोलीस, वाहतूक विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घ्यावी. गणेशोत्सव मंडळांना ना हरकत प्रमाणपत्रे व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने सुलभेतेने उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले. पुढील महिन्यात होणार्या गणेशोत्सवाच्या […]

Continue Reading

करदाता सेवा महासंचालनालय,मुंबई विभागीय कक्ष आणि बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या सहयोगाने जीएसटीची मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी परिसंवादाचे आयोजन

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कायद्याची मूलभूत तत्त्वे समजून घेण्यासाठी करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस), मुंबई विभागीय कक्षाने बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण यांच्या सहकार्याने, 5 ऑगस्ट, 2026 रोजी परिसंवादाचे आयोजन केले. वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील मूलभूत संकल्पनांविषयी विद्यार्थी, उद्योजक होऊ इच्छिणारे युवा तसेच इतर संबंधित घटकांमध्ये जनजागृती करणे, करसाक्षरतेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रबांधणी, आर्थिक […]

Continue Reading

माझ्या एरंडोल मतदारसंघासाठी ‘”सरसकट विशेष मदत पॅकेज” जाहीर करण्याची आमदार ॲड. अमोल पाटील यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी…

माझ्या एरंडोल मतदारसंघासाठी ‘”सरसकट विशेष मदत पॅकेज” जाहीर करण्याची आमदार ॲड. अमोल पाटील यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी… एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. एरंडोल, : जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल, पारोळा व भडगाव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती, गुरेढोरे, घरे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. अक्षरशः अनेकांचे संसार महापुराच्या पाण्यात वाहून गेलेत.या पार्श्वभूमीवर एरंडोलचे […]

Continue Reading

१७ ऑगस्टला जळगावात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन

१७ ऑगस्टला जळगावात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन ईएसआयसी, ईपीएफ, किमान वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार निदर्शने एरंडोल प्रतिनिधी विज्ञान पाटील. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे देशव्यापी जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे सिव्हील हॉस्पिटलची सद्यस्थिती आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे सिव्हील हॉस्पिटलची सद्यस्थिती आणि आतापर्यंत झालेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठाणे येथील ९०० खाटांचे अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे कामकाज अत्यंत वेगाने आणि ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण […]

Continue Reading

‘No Return-No Exchange’ अटीवर विभागीय आयुक्तांचा दणका; ग्राहकांचे हक्क डावलणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचे आदेश

जळगाव : ग्राहकांना “No Return”, “No Exchange” अशा अटी लावून त्यांच्या कायदेशीर हक्कांवर मर्यादा आणणाऱ्या दुकानदारांविरोधात चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत. माहितीचा अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे तालुका सहसंघटक तथा सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. […]

Continue Reading

महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

आजार कितीही गंभीर आणि मोठा असला तरी केवळ पैसे नाही म्हणून गरिबांचे उपचार थांबू नये, यासाठी राज्य शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध केला आहे. येथे आयोजित महाआरोग्य शिबिर हे गरीब रुग्णांसाठी एक वरदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात आयोजित […]

Continue Reading


मुंबईतील नरिमन पॉइंट येथे प्राप्तिकर विभागाच्या ‘आयकर सिंधू’ या अत्याधुनिक नव्या इमारतीचे केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सीतारामन यांनी नागरिक केंद्रित शासनावर भर देत, आयकर अधिकाऱ्यांना सहानुभूती, संवेदनशीलता आणि लोकसेवेच्या भावनेने अधिकारांचा वापर करण्याचे आवाहन केले

केंद्रीय वित्त  आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे प्राप्तिकर विभागाच्या ‘आयकर सिंधु’ या अत्याधुनिक नवीन कार्यालयीन संकुलाचे उद्घाटन केले.   कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात बोलताना, सीतारामन यांनी सर्वप्रथम 1999 च्या कारगिल युद्धात प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. देशभक्ती आणि लोकसेवेचे मूल्य त्यांनी यानिमित्ताने अधोरेखित […]

Continue Reading