चंद्रपूर /खडसंगी :- गावातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, आयुष्मान कार्ड हे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या कडून काढले जातात, राशन दुकानावर आयुष्मान कार्ड झेरॉक्स प्रत दिल्याशिवाय राशन देत नाहीत त्यामुळे कार्ड काढण्यासाठी गावातील खूप गर्दी होत आहे, गोरगरीब जनतेची लूट होत आहे, संपूर्ण कुटुंबाचे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी 500 ते 600 रुपये लागत आहेत, त्यामुळे गोरगरिबाकडे कोणाकडे पैसे असतात किंवा नसतात त्यामुळे ग्रामपंचायत ने लक्ष घातलं पाहिजे,आपली ग्रामपंचायत कार्यालय आतापर्यंत कुठल्याही योजनेची अंमलबजावणी करत नाहीत, गावातील जनतेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लूट होता आहे प्रत्येकाने पन्नास रुपये शंभर रुपये या कार्डसाठी मोजावे लागत आहेत, याला कोण जबाबदार, केंद्र सरकार राज्य सरकार प्रत्येक स्कीम ग्रामपंचायत कार्यालय यांच्यामार्फत राबविले जातात, पण आपल्यातली ग्रामपंचायत कार्यालय कुठलीही शासनाची जनजागृती व स्कीम राबवत नाहीत, प्रत्येक नागरिकांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय कडे, केंद्र सरकार व राज्य सरकार ची स्कीम, विविध योजनेचे कार्ड काढण्यासाठी संपर्क साधावा,, कार्ड काढण्यासाठी दहा ते वीस रुपये ची ग्रामपंचायत कार्यालयाची पावती काडुन कार्ड काढण्यात येते, प्रिंट व लॅमिनेशन करून काढून देण्यात येते, हे सर्वांनी नोंद करून घ्यावी, ग्रामपंचायत कार्यालय याविषयी अंमलबजावणी करत नसल्यास,
गावकऱ्यांच्या सुसिद्धीसाठी ग्रामपंचायत कार्यालय मार्फत योजना राबविले जातात, पण आपली ग्रामपंचायत कार्यालय कुठलीही अंमलबजावणी करत नाही, याला फक्त ग्रामपंचायत जबाबदार, यावर लवकरात लवकर ग्रामपंचायत कार्यालय लक्ष घालून प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावा ,
अन्यथा, गावातील नागरिकांना सोबत घेऊन, मी लवकरच माननीय, जिल्हाधिकारी साहेबांना याविषयी निवेदन देणार आहे,
व गावकऱ्यांना सर्वांना सुचित करण्यात येते की, ग्रामपंचायत चा टॅक्स भरायचा असेल त्यांनी डिजिटल बारकोड फोन पे गुगल पे वर भरा परस्पर पैसे देऊ नका, दलाला पासून सावध राहा
आपला शुभचिंतक, माहिती अधिकार कार्यकर्ता ,युवाशक्ती ग्रामविकास संघटन जिल्हा सचिव चंद्रपूर जिल्हा, टाइम्स ऑफ ऑरेंज सिटी जिल्हा प्रतिनिधी, टाइम्स ऑफ ऑरेंज सिटी ऑनलाईन न्युज पोर्टल संपादक पंचशिल वाळके 9326162536


