भारतीय नागरिकांचा श्वास असलेले संविधान जिवंत ठेवा- रणजीत मेश्राम
काष्ट्राइब द्वारा संविधान दिन साजरा
नागपूर– डाँ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील अनेक कळा सोसून अमूल्य असे संविधानाला जन्म दिला व जगातील सुंदर असे संविधान देशाला दिले,भारतीय संविधानातून शोषित वंचित समूहाच श्वास मोकळा झाला.आज या संविधानाचा गळा घोटण्याचे सुरु आहे संविधान जनतेचा श्वास
आहे. ते जिवंत ठेवा असे प्रतिपादन प्रसिद्ध पत्रकार रणजीत मेश्राम यांनी काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ सलग्न काष्ट्राईब महिला आघाडी द्वारा आयोजित संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान आणि आम्ही या विषयावर चर्चा सत्र व कवी संमेलन प्रसंगी संविधान चौक येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब,होते त्यांनी मार्गदर्शन करताना आंबेडकरी समाजा समोर अनेक प्रश्न आहे, समाज गटा तटात विभागला आहे, बाबासाहेबांनी खस्ता खाऊन परिवाराकडे दुर्लक्ष केले, आम्हाला सुटबुतात आणले पण नेते परिवार मर्यादित झाले त्यामुळे समाजात एकजूट राहली नाही. आज समाजाला खंबीर नेतृत्व नाही. समाज आज इव्हेन्ट कडे वळत आहे. मूळ प्रश्न त्यामुळं अडगलीत पडतात एक दिवस उत्सव करून प्रश्न सुटणार नाहीत, बाबासाहेब यांनी दिलेल्या संगठनना ऊर्जा देऊन समाज एकजूट झाला तरच समाज व देश सुरक्षित राहील, एस क्यू जामा यांनी संविधानाला निष्क्रिय करण्याचे शडयंत्र बीजेपी करित आहे म्हणून बीजेपी ला पराभूत करण्यासाठी सर्व संगठननी मतभेद सोडून एकत्र यावे असे आवाहन केले. काम्रेड अरुण वनकर यांनी देशातील बीजेपी च्या कार्यकाळात देश रसातळाला गेला असून सामाजिक व शैक्षणिक बदल घडवून आणायचा असेल तर मनुवादी सरकार बदलणे गरजेचे आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे ऍड रोशन बागडे, अध्यक्ष नागपूर बार असोसिएशन, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डाँ सुरेश चवरे , घनश्याम फुसे, काम्रेड राजेंद्र साठे,यशवंत निकोसे, प्रा रमेश पिसे,प्रा राहुल मुन,अब्दुल पाशा,प्रा प्रज्ञा मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्रानंतर एम एस जांभुळे लिखित व डाँ वीणा राऊत दिग्दर्शीत *संविधान जागर* लघु नाट्य सदर केले.
दुसऱ्या सत्रात गोविंद वाघमारे, यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन आयोजित करण्यात आले संमेलचे संचालन मनोहर गजभिये, खेमराज भोयर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुषमा कळमकर, संचालन माया उके व सिताराम राठोड यांनी केले व आभार प्रगतीताई पाटील यांनी केले.प्रा एम एस वानखेडे, प्रा जयंत जांभुळकर, रणजीत रामटेके, राजेश ढेंगरे सुगत रामटेके अरविंद पाटील, अशोक पाटील, जयंत साठे,कैलास खोंडे उपस्थित होते…
*संकलन -सुषमा कळमकर*

