एरंडोल नगरीचे आरोग्य दूत विक्की खोकरे यांचा “प्रेरणा दूत पुरस्कार” देऊन होणार सन्मान…!

महाराष्ट्र
Share

एरंडोल नगरीचे आरोग्य दूत विक्की खोकरे यांचा “प्रेरणा दूत पुरस्कार” देऊन होणार सन्मान…!

 

प्रतिनिधी एरंडोल (विज्ञान पाटील)
येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांनी केलेल्या उल्लेखनीय आरोग्य सेवेबद्दल त्यांचा नागपूर येथे हिंद स्वराज्य एकात्मता फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय “प्रेरणा दूत पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे
सदर पुरस्कार सोहळा पुढील महिन्यात नागपूर येथे होणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह व ५१०० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विक्की खोकरे हे रात्र बेरात्री रुग्णाच्या मदतीसाठी धावून जात अनेकांना जीवनदान दिले आहे व कोरोना काळातही आपली जीवाची पर्वा न करता अनेक कोरोना ग्रस्त रुग्णांना आधार देत मोलाची मदत केली आहे.
एरंडोल नगरीच्या युवकाचां पुरस्कार देऊन गौरव होणार असल्याने (उ.बा.ठाकरे) शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ हर्षल दादा माने, माजी जि.प सदस्य नाना भाऊ महाजन, उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दशरथ भाऊ महाजन, जेष्ठ शिवसैनिक रमेश अण्णा महाजन, जेष्ठ विधी तज्ञ ॲड. मोहन शुक्ला, ॲड. विलास मोरे, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, किशोर भाऊ निबांळकर ,राजू आबा चौधरी, रविंद्र अण्णा महाजन, कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय अण्णा महाजन, माजी उपनगराध्यक्ष ॲड. नितीन महाजन, जेष्ठ पत्रकार बि.एस चौधरी सर, प्रमोद अण्णा पाटील, शैलेश चौधरी, कैलास भाऊ महाजन, प्रमोद चौधरी, कॉग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रा.आर एस पाटील, माजी नगरसेवक जगदीश भाऊ ठाकुर, दादाजी दरबार सांगवी विश्वस्त अध्यक्ष प्रदीप पाटील, विश्वस्त छोटू भाऊ बडगुजर, बन्सी भाऊ पाटील, दगा नाना पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ साळी, विजय पाटील, परेश पाटील, अमीन मुजावर, आदींनी विक्की खोकरे यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत