सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने भारत सरकारची मोठी झेप

राष्ट्रीय
Share

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांच्या हस्ते स्वदेशी बनावटीच्या आय क्यू म्हणजेच, बुद्ध्यांक चाचणी मूल्यांकन किटचे राष्ट्रार्पण

 

सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल टाकत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी आज वंशिका नंदकिशोर माने आणि इतर सात दिव्यांग लाभार्थ्यांना एक कोटीवे विशिष्ट अपंगत्व ओळखपत्र (यूडीआयडी) प्रदान केले.

 

2017 साली यूडीआयडी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली, ज्याचा उद्देश, देशातील दिव्यांग व्यक्तीला एक विशेष ओळखपत्र प्रदान करणे हा आहे. या योजनेमुळे, देशातील कल्याणकारी योजनांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी एक विशिष्ट डेटाबेस तयार होईल.

याच कार्यक्रमात, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्र्यांच्या हस्ते, स्वदेशी आय क्यू (बुद्ध्यांक मूल्यांकन) किटचे राष्ट्रार्पणही करण्यात आले, आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातील एक मैलाचा टप्पा आपण याद्वारे साध्य केला आहे.

दिव्यांग व्यक्ती, देशासाठी एक मौल्यवान मनुष्यबळ आहे यावर डॉ. विरेंद्र कुमार यांनी आपल्या भाषणात भर दिला. एकात्मिक समाज, दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. स्वदेशी आयक्यू चाचणी किट ची निर्मिती, भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत, त्यांनी पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या दृष्टिकोनाचा पुनरुच्चार केला.

राज्य मंत्री (दिव्यांग व्यक्ती) प्रतिमा भौमिक यांनी अधोरेखित केले की सरकारने विकसित केलेल्या साधनांचा ईशान्येकडील दुर्गम भागांना आणि परदेशातील गरजूंनाही लाभ व्हायला हवा. स्वदेशी  चाचणी किट च्या निर्मितीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बौद्धिक अपंगत्वाच्या क्षेत्रात नव्या  संशोधनाचा मार्ग मोकळा करणे आणि भारतीय नागरिकांना कमी खर्चात त्यासाठी साधन उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेवर त्यांनी भर दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत