*माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा व तालुका निहाय पदाधिकारी बैठक आज कोल्हापूर येथे संपन्न…*
महासंघातील नवीन कार्यकारिणी साठी मार्गदर्शन व खुला संवाद…
*कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा विस्तार व्याप दिवसेंदिवस वाढत असून महासंघात प्रामाणिक व अभ्यासू लोकांचा सहभाग वाढत आहे.* जिल्ह्यातील अनेक समस्यांना वाचा फोडत सर्वसामान्य नागरिकांना आधार बनण्याचा प्रयत्न महासंघाचे प्रत्येक सदस्य करतो. आज *महासंघाची यावर्षीची चौथी बैठक* कोल्हापूर येथील वालावलकर हॉस्पिटल च्या सभागृहात संपन्न झाली. यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सदर *कार्यक्रमाची स्वागत व प्रास्ताविक महासंघाचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष दीपक जाधव* यांनी मांडले. त्यानंतर *ॲड. स्मिता हराळे मॅडम यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना नोटरी आणि रजिस्टर तसेच बेकायदेशीर दस्त व बोगस कागदपत्रं विषयी सखोल मार्गदर्शन केले.*
महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र *कार्याध्यक्ष अमर शेणेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना भारतीय संविधान व माहीती अधीकार कायद्याचे महत्व* पटवून दिले. यावेळी कोल्हापूर शहर अध्यक्ष *डॉ.संतोष कुलकर्णी यांनी प्रामाणिक माहिती अधिकार कार्यकर्ता कसा असावा* याबद्दल दिशा व मार्गदर्शन केले.याप्रसंगी *शरद पोवार, संतोष भिसुरे, असिस कुतीनो* यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर माहिती अधिकार महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते *शिवाजी कापसे व संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर यांना उत्कृष्ट कार्य* केल्याबद्दल शाल देऊन सत्कर त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बोलताना महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी यांनी *रक्तदान, आरोग्य शिबीर, वार्षिक वर्गणी व भविष्यातील वाटचाल* याविषयी मार्गदर्शन करत महासंघातील प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्याच्या लढ्यात पाठीशी ठाम उभा असल्याचे सांगत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले. सदर बैठकीचा गोड शेवट अर्थात आभारप्रदर्शन हातकणंगले तालुका उपाध्यक्ष अनिस मुजावर यांनी मांडले.

