तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा निर्भय शिंपी चा प्रथम क्रमांक

महाराष्ट्र
Share

ऐरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील)

एरंडोल : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल चा वर्ग आठवी चा विद्यार्थी निर्भय शिंपी याने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावला सदर विज्ञान प्रदर्शन दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी कासोदा येथील भारती माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट या ठिकाणी सादर केले होते सदर विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधून तीन प्रोजेक्ट सादर करण्यात आले होते त्यात पाचवी ते आठवी या गटातून निर्भय शिंपी याने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे सदर या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण एरंडोल तालुका गटशिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र महाजन सर यांचे हस्ते करण्यात आले त्याच्या प्रोजेक्टचे नाव _ smart glasses for blind persons सदर या यशस्वी विद्यार्थ्यांस शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन सर व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील विज्ञान शिक्षक राधा बोरसे किरण महाजन यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष शरदजी काबरा सर शाळेचे चेअरमन सिद्धेश जी महाजन सर सचिव श्रीकांत जी काबरा सर सहसचिव सागर मानुधने व संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद व शाळेचे प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत