बरांज मोकासा येथे,सौ.पल्लवी आन्याजी कोरडे यांचा गावकऱ्यांना न्याय व हक्कासाठी उपोषणाचा आज पाचवा दिवस
चंद्रपूर :- उपोषण करते त्यांची तब्येत ढासळली आहे,सलाईन सुरू आहे.तरी प्रशासन हे गेंड्याचं सोंग करून बसले आहे.
माननीय ठाणेदार भद्रावती हे स्वतः लक्ष ठेऊन आहेत.
आज तत्कालीन तलाठी बरांज मोकासा विनोद खोब्रागडे यांनी आज उपोषणाला भेट देऊन महिलांना दस्तऐवज पुराव्यानिशी कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमीटेड कंपनी बेंगलोर ही महसूल अधिकारी यांच्यासोबत कटकारस्थान व संगणमत करून बेकायदेशीर काम करुन बरांज मोकासा गावकऱ्यांवर मागील १५वर्षापासुन अन्याय अत्याचार कसे करीत आहे याबद्दल मार्गदर्शन केले,
ज्याअर्थी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा कार्यालयानी सदर कंपनीला प्रतक्ष ताबाच दिला नाही, तहसीलदार भद्रावती, उपविभागीय अधिकारी वरोरा, भुसंपादन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, खनिकर्म अधिकारी चंद्रपूर, यांनी में.कर्नाटक पावर कार्पोरेशन कंपनी लिमिटेड बेंगलोर यांना ताबाच दिला नाही,व कंपनीने ताबा घेतला नाही.
त्याअर्थी नियमबाह्य व बोगस अवैध उत्खनन कंपनी कसे काय करत आहे,
उद्या होना-या मीठींगमध्ये
मा. जिल्हाधिकार साहेब चंद्रपूर यांना हे प्रश्न जाब विचारावे.
जर सात दिवसात हा प्रश्न मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी तोडगा काढला नाही,तर सदर चोरीचा गुन्हा या कंपनीवर विनोद खोब्रागडे यांनी २०१५ मध्येच दाखल केला आहे, आपण कंपनी व महसूल अधिकारी यांचावर अट्रासिटीचे फौजदारी गुन्हे दाखल करावे व कंपनीचे काम बंद करावे.
असे मार्गदर्शन आज आमरण उपोषण करना-या महिलांना विनोद खोब्रागडे यांनी केले आहे,

अपीलार्थी
विनोद खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक वरोरा चंद्रपूर
*९८५०३८२४२६*
*८३२९४२३२६१*

