कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने जागामालकाच्या जमिनीवर भूमाफियांनी उभारल्या तीन बेकायदा अनधिकृत इमारती

महत्वाची बातमी महाराष्ट्र
Share

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने जागामालकाच्या जमिनीवर भूमाफियांनी उभारल्या तीन बेकायदा अनधिकृत इमारती

 

विनोद काळकोपरे:- कल्याण तालुका प्रतिनिधी
कल्याण पूर्व मधील चिंचपाडा येथील जागामालक बाकाबाई केने व बाबू साळुंखे यांच्या जागेवरच कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांच्या संगनमताने बेकायदा अनधिकृत इमारती उभारल्या आहेत. बाबू साळुंखे ,बाकाबाई केणे , येसूबाई भंडारे व राईबाई पाटील यांच्या अठरा गुंठे जमिनीवर भगवान कृष्णां म्हात्रे ,भगवान महादू म्हात्रे, तसेच अनिल म्हात्रे यांनी जागेचा अनधिकृतपणे ताबा घेऊन ‘ मंगलमूर्ती विकासक ‘ या नावाने ‘ जय हनुमान प्लाझा ‘ सह अजून तीन इमारती अनधिकृतपणे उभ्या केल्या याची साधी कुनकुन कल्याण डोंबिवली महानगरपालिका ,आयुक्त , सहाय्यक आयुक्त ,अधिकारी तसेच पोलीस यंत्रणेला लागली नाही हे नवलच आहे की ह्या अनधिकृत इमारती ह्यांच्याच आशीर्वादाने उभारल्या गेल्या हे अजून तरी गुलदस्त्यातच आहे . वरील विकासकाने कोणतीही बांधकाम परवानगी न घेता रेरा नोंदणी न करताच त्यांनी फ्लॅट , दुकान गाळे , विकले ह्याची दखल न कल्याण डोंबिवली महानगरपालिका ,पोलीस खाते घेत असल्यामुळे नाईलाजास्तव बाबू साळुंखे ,बाकाबाई केणे यांनी येत्या 26 जानेवारी या दिवशी अनधिकृत बांधकाम विरोधात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे .
बाबू साळुंखे ,बाकाबाई केणे ,येसूबाई भंडारे, आणि राईबाई पाटील यांची पिढीजात असलेली सर्व्हे नं ३५/८ व ३६/२ ह्या ९६ गुंठे जमीनिच्या सातबारा वरती अधिकृत पणे नावे असताना. २०२० साली ह्या गरीब, बेसहारा असणाऱ्या बाबू साळुंखे , बाकाबाई केणे यांची अठरा गुंठे जमीन कब्जा करून त्या ठिकाणी तीन इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत याची तक्रार लोकशाही दिनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकातील मागील आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे आपली कैफियत मांडली . अनधिकृतपणे बिल्डिंग बांधणाऱ्या बिल्डरांवर एमआरटीपि नुसार गुन्हा नोंद होऊन सुद्धा बिल्डरावर कारवाई का नाही व ते अनधिकृत बांधकाम पाडण्यात का आले नाही याबाबत ९ (आय) वॉर्ड च्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना विचारण्यात आले .व त्या अनधिकृत इमारतींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असे आयुक्तांनी सांगितले. परंतु जय हनुमान प्लाझा वर बुलडोजर चालवून कारवाई होण्याआधीच आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची बदली झाली व कारवाई थांबली . नव्याने आलेल्या आयएस आयुक्त इंदूराणी जाखड यांची ही भेट बाबू साळुंखे यांनी घेऊन सर्व परिस्थिती सांगितली व वरील अनधिकृत बांधकाम प्रकरणी आयुक्त इंदूराणी जाखड यांनी अनधिकृत बांधकाम पाडण्याचे लेखी आदेश दिले आहेत परंतु बांधकाम तोडण्याआधीच उपायुक्त बोरकर यांची ही बदली झाली . बेकायदा बांधकामाची दखल घेत ९(आय) प्रभाग क्षेत्र चे तत्कालीन अधिकारी दीपक शिंदे यांनी १७ जुलै २०२१ मध्ये भगवान म्हात्रे यांच्याविरुद्ध एमआरटीपि नुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला. तसेच संजय साबळे व किशोर ठाकूर या अधिकारी यांनी ही काही कारवाई नाही केली. या सर्व अनधिकृत बांधकामाला स्थानिक लोकप्रतिनिधी हे पाठीशी घालत असल्यामुळेंच अनधिकृत बांधकाम वर तोडक कारवाई सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर व अधिकारी यांच्यामार्फत केली जात नाहीआहे . यात सर्वांचे हात ओले झाल्याचे आरोप बाबू साळुंखे यांनी केला आहे .
पीडित कुंटुंबियांनी २०२० ते आज पर्यंत कमीत कमी तीस वेळा पालिका आयुक्त ,जिल्हाधिकारी ,कोकण भवन ,नगरविकास खाते ,मंत्रालय च्या पायऱ्या झिजवून न्याय मिळाला नाही आहे .तेव्हा आता नव्याने आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका वर आयएएस आयुक्त इंदुराणी जाखड ह्या वरील सर्व अनधिकृत बांधकामाला पाडण्याची कारवाई करतील का या कडे बाबू साळुंखे व बाकाबाई केणे तसेच इतर जागामालक या आशेने पाहत आहे की आयुक्त मॅडम आम्हाला भविष्यात नक्कीच न्याय मिळवून देतील का❓

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत