विल बी जॉइंट किलर आंबेडकरांशिवाय इंडिया अपूर्ण
नागपूर :- बाळासाहेब आंबेडकर हे नाव केवळ वंशज वारस म्हणूनच नाही तर भूमिका त्यातला ठामपणा त्यासाठी निडर बेधडक असलेला तो प्रकाश आहे , म्हणून केडर आणि भूमिका अश्या दुहींचा आकडा लक्षात घेता २० हजार फरकाने लागणारे निकाल फिरवण्याची राजकीय क्षमता आणि कसब आंबेडकर यांच्याकडे आहे . भूमिकेचा ठामपणा आणि सातत्य ठेवणारा एकमेव चेहरा म्हणून बाळासाहेब सर्वमान्य असावेत . मोदींच्या समोर एकवटलेली समविचारी सदर लक्षात घेता त्यांच्यात सर्व आहे नाहीत फक्त आंबेडकर . बाळासाहेब इंडियात येणे ( घेणे ) भाजपच्या दृष्टीने रामाने वक्रदृष्टी केल्या सम आहे . बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वायत्त शक्ती निर्णायक नाही मात्र ते इंडियात असणे आणि नसणे यातला फरक आकड्यात मोजला तर २५ टक्के जागा असा होऊ शकतो . मागच्या खेपेत त्यांनी एमआयएम सोबत मते घेऊन १२ खासदार त्यांच्याच नाआवडत्या पक्षाची गुलालात लोळवली , लोळवली हा शब्द पराभवासाठी असतो मात्र गुलालात या अर्थी , आंबेडकराना नको असलेले त्यांच्याच मुळे निवडून आलेली , म्हणून समभाग या तत्वावर सहभाग अपरिहार्य ठरतो , म्हणूनच त्यांनी इंडियात जाने परस्परांची निकड ठरते ,केवळ राजकीय नाही तर लोकशाही च्या दृष्टीने निवडणुकीच्या मैदानात ही युती लोकमागणीचे स्वरूपास येत आहे .
बाळासाहेब आंबेडकर लेफ्ट नाहीत , ते प्रतिगामी देखील नाहीत ,त्यांच्या पुरोगामीत्वात पंढरपूर आहे , त्या केडरने आंबेडकरवाद घेऊन बारा बलुतेदारात देखील काही बूथ आणि अनेक युथ प्रकाशमान केले आहेत त्यामुळे , आठवले सारखे पाहिजे जातीचे च्या पलीकडे जाऊन बाळासाहेब यांना एक्सेस आहे . मराठा आरक्षणात त्यांनी नेहमीच गोड भूमिका घेतल्याने , बाळासाहेबांना श्रध्येय मानणारे कमी नाहीत . अशोक हिंगे नावाचा मराठा समाजाचा चळवळीत जीवन दिलेला एक युवक बाळासाहेबांचा मराठवाडी सरदार आहे , थेट औरंगजेबाच्या कबरेला चादर प्रदान करणारे बाळासाहेब म्हणजे सलोख्याचा प्रकाश देखील ठरतात . त्यामुळे बाळासाहेब म्हणजे केवळ मागासवर्गीयांची मते असे अत्यल्प मोजले जाऊ शकत नाहीत , त्यांच्याकडे आता निर्णायक टक्के एकवटले आहेत , कडवे कडवट कर्मट लढवय्या बाण्याची सुशिक्षित वकिली करणारी अनेक युवक बाळासाहेबांच्या राजकारणात विस्थापितांची सोय पाहतात .
बाळासाहेब आंबेडकर हे कॉंग्रेस आणि पवारांच्या प्रस्थापित राजकारणाच्या विरोधात पर्यायी भूमिकेत राहिलेले आहेत , याच सोबत ते संघ आणि मोदींच्या नीतीचे कडवे विरोधक देखील , या दोन्ही भूमिका एकत्रित पुढे जाऊ शकत नाहीत किमान एकीस स्थगिती देऊन अपरिहार्य तडजोड दृष्टीक्षेपात आहे , आणि त्याच न्वये कॉंग्रेस आणि पवारांच्या सोबत जुळवून घेताना त्यांनी मातोश्रीच्या सोबत भाजप विरोधातल्या सदरेवर दस्तक दिलेली आहे , फक्त आजवर ती अधिकृत नाही . मुंबईतल्या कार्यक्रमाला त्यांनी राहुल यांना बोलावले मात्र याच वेळी सेनेला तयार असताना आमंत्रण नव्हते , यावरून हाताशी असलेला होन घेऊन बाळासाहेब मोठा तह अपेक्षित ठेऊन आहेत . मात्र आज आपल्याला काय भेटते या पेक्षा नको त्याला नको तितके भेटू नये करिता भूमिका अपेक्षित आहे , बाळासाहेब आणि इंडिया अश्या दोन्ही टोकांची परिहार्यता ठळक आहे . इंडियाला आंबेडकर आणि आंबेडकर वाद या दोहींची गरज आणि दोहांचा स्पेस आहे .
बाळासाहेबांच्या लाखाच्या सभा उंच इमारतींच्या मुंबईत होतात , झोपड्या असलेल्या धारावीत होतात , उसतोड कामगारांच्या बीड मध्ये देखील होतात , त्यामुळे बाळासाहेब म्हणजे सोबत लागतातच हे इंडिया वाल्यांनी समजून आणि मोजून घेण्याची गरज आहे .

