मोदी सरकार च्या संकल्प रथा ला विरोध केल्याने नगरध्यक्षाला अटक!

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र
Share

मोदी सरकार च्या संकल्प रथा ला विरोध केल्याने नगरध्यक्षाला अटक!

सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही

सिंदेवाही: प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात साजरा होत असतांना, सिंदेवाही चे नगरध्यक्ष स्वप्नील कावळे यांना अटक केल्याने संपूर्ण जिल्हात चर्चेचा विषय होता,राजकीय क्षेत्रात या अटकेमुळे तर्क वितर्क ना उधाण आले आहे,नेमक अटक प्रकरण काय हे जाणून घेऊया,भारतीय जनता पार्टी किंवा मोदी सरकार कडून 2024 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोदी सरकार च्या योजना म्हणून संपूर्ण जिल्हात संकल्प रथ यात्रा ची गाडी फिरत आहे,मोदी सरकार ने आपल्या कार्यकाळात काय काम केले याची माहिती नागरिकांना कळावी असा ह्या रथ यात्रेचा उद्देश आहे आणी त्या नुसार वरून आलेल्या आदेशानुसार शासकीय कर्मचारी तालुक्यातील गावागावत हा रथ नेण्याची जबाबदारी शासकीय कर्मचारी वर्गावर आहे,आत्ता इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की संकल्प यात्रा ही भारत सरकार ची आहे की मोदी सरकार ची जर देशात योजना ह्या भारत सरकार च्या नावाने असतात मग आत्ताच मोदी सरकार च्या नावाने कश्या,काही बुद्धिवंत व अभ्यासु नागरिकना सुद्धा या संकल्प रथ यात्रेबाबत प्रश्न आहेत,पण वरील आलेल्या आदेशानुसार फक्त तुम्ही ऐका काही विचारू नका असे धोरण या संकल्प यात्रेदरम्यान वापरण्यात आले आहे,आज संकल्प यात्रेमधील शासकीय कर्मचारी सुद्धा नागरिकांनी प्रश्न विचारले तर ते निरुत्तर होतात,एक उदाहरण च बघा मोदी सरकार कडून गोर गरीब नागरिकांना उज्ज्वला गॅस पुरवठा करण्यात आला आहे,पण त्याचं गोर गरीब कुटुंबातील नागरिकांना पुढील सिलेंडर कसे सोडवावे हा प्रश्न आहे,सिलेंडर चे भाव प्रचंड वाढविले आहेत मग उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत पुरवठा करण्यात आला असला तरी खरंच या योजनेचा फायदा सामान्य गोर गरिबांना झाला का? आजही गोर गरीब कुटुंब सिलेंडर घेऊ शकत नसल्याने त्यानी चुली वरच स्वयंपाक सुरु केला आहे,फक्त योजनेचा गवागवा सुरु आहे पण त्याचा फायदा किती नागरिकांना झाला आणी ते या योजनेमुळे खरंच सुखी झाले का हे सुद्धा तपासन गरजेचं आहे, समोर काही लिहण्या अगोदर स्पष्ट करतो की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही किंवा समर्थक नाही आज जी मोदी सरकार चा संकल्प रथ यात्रे बाबत जे नागरिकां च्या मनात जे प्रश्न आहेत त्या बाबत लिहत आहे,मोदी सरकार चा संकल्प यात्रा रथ सिंदेवाही नगर पंचायत मध्ये येणार असल्याचे कळविण्यात आले होते व त्या नुसार हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रम सुरु असताना स्वप्नील कावळे ह्यांनी या नागरिकांचे प्रश्न म्हणून संबंधित संकल्प रथ यात्रेतील कर्मचारी यांना विचारले की या योजना भारत सरकार च्या आहेत की मोदी सरकार च्या आज पर्यंत च्या काळत ज्या योजना आल्या त्या भारत सरकार म्हणूनच आल्या कोणत्याही एका व्यक्तीच्या नावाने आल्या नाही,म्हणून स्वप्नील कावळे यांनी आपणास ही बोलण्याची संधी द्या असे म्हटले,पण वरील हुकूमाचे पालन करीत संबंधित रथ यात्रवरील कर्मचारी यांनी आपणास बोलण्याची संधी देण्यात येणार नाही असे सांगितले,त्या मुळे लोकशाही मेली आहे की जिवंत आहे,असा प्रश्न निर्माण झाला व स्वप्नील कावळे यांनी विरोध केला,स्वप्नील कावळे यांनी विरोध केल्यामुळे शासकीय कामात अळथळा निर्माण केला म्हणून सिंदेवाही पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता नुसार कलम 353, व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला,आत्ता स्वप्नील कावळे यांनी केलेला प्रश्न हा विरोध हा लोकशाही च्या मार्गाने करून जर गुन्हा दाखल होत असेल तर सामान्य नागरिक सुद्धा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने प्रश्न विचारणार नाही,लोकशाही कडून हुकूमशाही कडे तर वाटचाल होत नाही आहे ना हे बघण्याची गरज आत्ता सामान्य नागरिकाची सुद्धा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत