ग्रामगीता महाविद्याल चिमूर च्या विद्यार्थिनींचा सुयश

महत्वाची बातमी
Share

तालुका प्रतिनिधी. चंदन पाटील

ग्रामगीता महाविद्यालय चिमूर च्या विद्यार्थिनींचा सुयश

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे गणित विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून आंतर महाविद्यालयीन पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ग्रामगीता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता. स्पर्धेमध्ये कु. तनश्री वरघने व कु. भूमिका बनकर (बीएससी-२) यांनी द्वितीय क्रमांक पटकावीला. त्याबद्दल महाविद्यालय स्तरावर सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. विद्यार्थीनींनी आपल्या यशाचे श्रेय गणित विभाग प्रमुख प्रा. नागेश ढोरे, प्रा. सोनाली कांबळी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर यांना दिले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत