राज सगळ्याच हाय जयंतीत अठरा पगड मावळ
(टाइम्स ऑफ़ ऑरेंज सिटी वृत्तसंकलन)
नागपुर :- आमचाच देव म्हणून चौकट करणारे बा विठ्ठलाला चुकले नाहीत , तिथे शिवरायांना ते थोडीच चुकणार होत , मात्र जसे गर्दीच्या पलीकडे जाऊन आणि बडव्यांचे कडे भेदून पांडुरंगाने जसे सावता चोखा नरहरी साधले सांधले , नव्हे नव्हे तर हा सावळा हरी अरणला संताच्या दारी देवाची दिंडी घेऊन जायचा , तसे आमचेच महाराज म्हणून जो कोण चंचू अपराध करतात ते कालच्या उत्सवात अंतर्मुख होतील , महाराजांबद्दल असलेली भक्ती सर्वदूर आणि अठरा पगड समाजात असलेली काल कुर्निसातबद्ध झाली , ओबीसी मागासवर्गीय मुस्लिम युवकांच्या डीपीवर शिवबा राजे होते , गावागावात गाड्याला महाराजांचा झेंडा होता , महाराज सर्वांसाठी कुठल्याही उभारणीचे भांडवल नाहीत आणि नसावेत , ती आमच्या मातीची अस्मिता माणसांची तर आहेच मात्र दुर्दैवाने काही वेळा तसा प्रयत्न होतो आणि वाटते कि महाराज जातीच्या कोंडावड्यात तर जात नाहीत , मात्र कैद मानणार तो आपला राजा कसला , आपल्या छत्रपती शिवरायांनी आग्रा चुकवला झुकवला , तिथे असले जातीचे कित्येक कडे रायगडाच्या स्वामीला थोडीच कैद करणार .आपलाच गैरसमज मात्र तो उघडा पडायला कालची जयंती साक्ष बनली . जातीच्या पलीकडे जाऊन अनेकांनी जयंती म्हणजे लेकीचे लग्न म्हणून साजरी केली , समिधा त्या भव्यतेत समर्पित केली . मुळात महाराज सर्वांचे म्हणून कुणी किती खर्च केला यावरून कुणाचे कौतुक करण्याची गरज देखील नाही मात्र काहींनी नेहमी महाराज आमचेच हा जो होरा सुप्त पद्धतीने अग्रप्रेषित केला आहे त्यास मात्र महाराजांच्या उंचीने काल पाताळ दाखवला . शिवाजी राजे म्हटले कि महाराष्ट्राच्या मातीतला कुठलाही माणूस पेटून उठतो , विसरून जातो माझी प[पोट जात काय धर्म काय , बस त्या एका युगनायकाने स्वराज्य दिले म्हणून , मग क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा समर्थक शिवभक्त होऊन जातो आणि अभिमानाने सांगत राहतो कुळाने माझ्या शोधली समाधी राजाची , मग जयभीम वाला येतो आणि म्हणतो माझ्या बाबासाहेबांना महाराजांच्या स्वराज्य प्रेरणा होती , हा राजा माझा आहे आणि वरच्या पट्टीत कडक स्वरात म्हणतो , दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक तो रायगडावर एक चवदार तळ्यावर , इथला मुस्लीम म्हणतो रायगडावर मशीद बांधणारा आणि कुराण सापडले तर अदबेने परत करणारा हा राजा आमचा हि आवडता , म्हणूनच शिवाजी महाराजांचा फोटो दिसला कि मुस्लीम मावळ्यांना पाणी घेऊन धावतो .
म्हणूनच जातीच्या अडून महाराजांना जर कुणी गुंफण्याचा यत्न प्रयत्न कावा केला तर त्याचे दात घशात कायम पडतील , भले महाराजांचे नाव घेऊन कुणी जरी डाव साधला तरी इथला अठरा पगड मावळ तरीही महाराज आमचे देखील हे म्हणत राहील , हे लिहून ठेवले पाहिजे …

