मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

महत्वाची बातमी
Share

मराठा समाजाला त ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील उपोषण करीत आहेत. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी लोहारा तालुक्यातील स मराठा युवकांनी अनेक ठीकाणी शांततेत आंदोलन केले होते. परंतु, लोहारा पोलिसांनी क या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून ि हे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.लोहारा येथे मराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावे या मागणीसाठी लोहारा तालुक्यातील मराठा युवकांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देऊन शांततेत लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले होते. परंतु, शांतातापूर्वक करत असलेल्या आंदोलनास दडपण्यासाठी लोहारा पोलिसांनी जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले आहेत. हे आंदोलन शांततेत करुनहीगुन्हे दाखल केल्याने मराठा समाजावर अन्याय करण्यात आल्याचे नमूद करून हे दाखल गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावेत अन्यथा राज्य सरकारला येणाऱ्या काळात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर धानुरीचे उपसरपंच विठ्ठल बुरटुकने, नगरसेवक प्रशांत काळे, विठ्ठल साठे, अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, धनराज बिराजदार, अभिजीत साळुंके, नेताजी भोकरे, रवींद्र पाटील, शरद साळुंके, नेताजी गोरे, तानाजी पाटील, विजय लोमटे, सूरज साळुंके, आदी उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत