एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न.

महाराष्ट्र
Share

एरंडोल येथे राष्ट्रीय लोकअदालत संपन्न.

 

ऐंरंडोल प्रतिनिधी (विज्ञान पाटील)
एरंडोल – येथील तालुका विधी सेवा समिती एरंडोल येथे दि.०३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयाेजन करण्यात आले. राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ६४ दाखल पुर्व प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.१६,८६,६४१/- ची तडजोड झाली. तसेच न्यायालयात प्रलंबित प्रकरणां पैकी एकुण १७ प्रकरणे निकाली झाली असून त्यात रक्कम रु.१३,८०,६२८/- ची तडजोड झाली. एकंदरीत एकुण ८१ प्रकरणे निकाली झालेली असून त्यात रक्कम ३०,६७,२६९/- रु.ची तडजोड झाली. सदर लोक अदालतीस एरंडोल न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्रीमती बी.ए.तळेकर हे पॅनल प्रमुख म्हणून तर पंच न्यायाधीश म्हणून विधिज्ञ शुभम समदानी उपस्थित होते. तसेच सहा. सरकारी अभियोक्ता डी.बी.वळवी, ॲड.डी.एस.पाटील, सचिव तालुका वकील संघ एरंडोल, ॲड.ए.एम.काळे ,ॲड.अजिंक्य काळे ,ॲड. डी. डी. पाटील , ॲड.आकाश महाजन, ॲड.आर.एम.दाभाडे व इतर विधीज्ञ तसेच चेतन शिरसाठ , नितीन बेडिस्कर, विशाल शिवरामे , गणेश चौधरी ,अंकित पुराणिक, शरद पाटील, एस.डी.पाटील, संदीप हरणे व न्यायालयीन कर्मचारी, पो.काॅ. संदीप पाटील, पो.कॉ. कैलास हडप इ. उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत