न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, एरंडोल येथे मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
एरंडोल ( प्रतिनिधी विज्ञान पाटील)
एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ,न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, येथे दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी प्रथम कवीश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन, शाळेचे प्रिन्सिपल हॅरी जॉन व व्हाईस प्रिन्सिपल सरिता पाटील , यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शरदजी काबरा सर,शाळेचे चेअरमन सिद्धेश महाजन हे लाभले होते.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी देवयानी ठाकूर, सिद्धीक्षा परदेशी ,प्रियंका चव्हाण, प्रांजल भागवत, देवयानी महाजन ,जयश्री साळी , अस्मिता वाणी या इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनींनी मराठी गीतावर समूह नृत्य सादर केले.तर शाळेच्या प्रिन्सिपल यांनी मराठी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच शाळेत शिक्षकांसाठी कविता गायन स्पर्धा ठेवण्यात आली होती.त्यात कविता पाटील ,ज्योती साबळे, तेजल श्रावणे, सीमा शिंदे, रेणुका बिर्ला , उज्ज्वला धनगर या शिक्षकांनी कविता गायन सादर केले. तसेच मराठी विभाग प्रमुख श्री.पी डी बोरसे सर यांनी मराठी भाषेचे महत्व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेझीम पथकाने आपले लेझीम नृत्य सादर करून मान्यवरांचा कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला.
या कार्यक्रमाची तयारी शाळेतील मराठीचे शिक्षक श्री.पी. डी बोरसे सर व सौ.उज्वला धनगर मॅडम यांनी करून घेतली.तसेच मराठी दिवसाचा आनंद शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,व विद्यार्थी यांनी घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला धनगर यांनी केले.

