सुकेश्वर जवळील गिरणा नदी पात्रात आढळले पोषण आहाराचे पाकीटे
एरंडोल प्रतिनिधी :-विज्ञान पाटील
एरंडोल तालुक्यात सुकेश्वर या तीर्थक्षेत्राजवळ जळगाव येथिल सर्पमित्र जगदीश बैरागी रा . जळगाव हे गिरणा नदी पात्रात पर्यावरणपुरक स्वछता मोहीम सोमवारी ५ मार्च रोजी राबवीत असताना त्यांना पोषण आहाराची पाकीटे आढळून आली विशेष हे की, काही पाकीटे नदी पत्रातील खडकावर तर काही पाकीटे काठावर व पाण्यात तरंगताना आढळून आली त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे . या घटने बाबत एकात्मिक बालविकास विभागाला कळविण्यात आल्यावर महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली.
सदर आढळून आलेली पाकीटे ही एकात्मिक बाल विकास विभागातर्फे अंगणवाड्यामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी बालकांना व गरोदर महिलांना वितरीत केली जातात खास विशेष हे की , पाकीटे मुदत संपण्याच्या आत नदीपात्रात फेकण्यामागचे काय गौडबंगाल आहे या बाबत परिसरात उलट सुलट चर्चा होत आहे
जगदीश बैरागी हे गिरणा नदी पात्र साफ करीत असताना त्यांना पाकीटे सापडली असता आधी त्यांना सदर पाकीटे ही प्लॅस्टिकची असावी असे वाटले परंतु बारकाईने निरीक्षण केल्यावर ती पोषण आहाराची पाकीटे असल्याचे दिसून आले . पाहणी करते वेळी माजी जि प सदस्य नानभाऊ महाजन यांचे सह पंचक्रोशीतील सरपंच व प्रतिष्ठित नागरिक उपस्थीत होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकीटे कोणी फेकली? का फेकली? याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे बोलले जाते कुपोषण दुर करण्यासाठी शासन पाण्यासारखा पैसा खर्च करीत असताना अन्नाची पाकीटे गिरणा नदी पात्रात फेकण्याचे धाडस कोणी केले. याचा शोध घेणे गरजेचे आहे असे जाणकारांचे मत आहे.

