*तुषार बगडे या नराधमांची फसवेगिरी!भामटा एक मुलीचा बाप असूनही करत आहे दुसरं लग्न*
सुनिल गेडाम तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
चिमुर : तालुक्यातील मौजा टेकेपार या गावातील तुषार मारोती बगडे नावाच्या नराधमाने एक मुलीचा पिता असतांना सुद्धा दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असून त्याने कायाद्याला न जुमानता लग्न पत्रिका सुद्धा छापल्या आहेत, सविस्तर प्रकरण काय आहे ते बघा, चिमुर तालुक्यातील मौजा खडसंगी या गावातील पूनम सुरेश गेडाम ही मुलगी लोणावळ्यात हाटेल मॅनेजमेंट चा कोर्स करून तिथे च एका हॉटेल मध्ये नोकरी करीत होती, तिची ओळख तालुक्यातील टेकेपार या गावाच्या तुषार मारोती बगडे याच्याशी झाली व ओळखीचं रूपांतर प्रेमात म्हणण्यापेक्षा पूनम ही कमवती असल्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या सोबत प्रेमाचे नाटक सुरु केले, काही दिवस लोणावळ्यात राहिल्या नंतर त्यांनी १८/११/२०२१ ला हिंदू रीती रिवाजा प्रमाणे सार्वजनिक श्री महादेव देवस्थान सामाजिक सेवा समिती वरोरा इथे लग्न केले त्यानंतर आपण घरी गावाला जाऊ म्हणून तिला टेकेपार इथे आणले पण इथं तुषार च्या आई जातीच्या मानसिक विकृत पणा ने झपाटलेली असून तिला आपल्या घरी महार जातीची सून सहन झाली नाही, कारण पूनम ही बौद्ध समाजाची होती तर तुषार बगडे हा माना समाजाचा होता, तुषार बगडे च्या आईला आपल्या जातीचा व्याधीने ग्रस्त
असल्याने पूनम ला घराबाहेर हाकलून लावले व महाराची पोरगी माझ्या घरात नाही पाहिजे म्हणून मुलगा तुषार ला बजावले,
व दोघांनाही घरातून हाकलून दिले,
या नंतर तुषार पूनम ला घेऊन चिमुर मध्ये किरायाने खोली करून
करून राहत होता, दुसऱ्याच्या जीवावर व आयतखाऊ असलेला तुषार हा कोणताही कामधंदा करीत नव्हता,
पण पूनम ने भविष्याची काळजी म्हणून स्वतः
आज पर्यंत कष्ट करून काही रक्कम जमा केली होती, व ती संसाराला लावत होती तर हा नराधम तिच्या पैश्यावर ऐश करत होता, अश्यातच पूनम ही गरोदर राहिली, पण जातीच्या मानसिकतेची गुलाम असलेली तुषार याची आई वारंवार पूनम ला सोडून तू घरी ये असे वारंवार सांगून त्याचे कान भरत होती, त्यामुळे त्याने आपल्या आईच्या म्हणण्यानुसार पूनमला सोडण्यासाठी तिचा छळ करायला सुरवात केली, ती गरोदर असतांना सुद्धा तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरवात केली, मार्तृत्वाची चाहूल ही प्रत्येक आई वडिलांसाठी सुखाची पर्वणी असतें पण पूनम पासून सुटका करण्यासाठी पूनम च्या गरोदर पनात कुठले तरी औषध आणून तिच्या नकळत तिला जेवणात दिले त्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी मासिक पाळी आली,त्या मुळे ते चिमुर मधील खाजगी डॉक्टर कडे गेले, डॉक्टर नि तपासणी केल्यावर होणार बाळ ही व्याधीग्रस्त होऊ शकत म्हणून बाळाला ठेऊ नका असा सल्ला दिला, आणि पूनम आणि तुषार यांच्या सहमतीने गर्भपात केला,
त्यानंतर होणाऱ्या बाळा पासून सुटका झाल्यानंतर तुषार बगडे हा नाटक करायला लागला मला बाळ पाहिजे होत पण तू योग्य काळजी घेतली नाही म्हणून पुन्हा तिचा शारीरिक व मानसिक छळ करायला लागला, व एक दिवस पूनम ला खोलीत ठेऊन पळून जाण्याचा षडयंत्र रचल, त्यामुळे त्याने आपले साहित्य सुद्धा भरलं पण वेळीच पूनमच्या लक्ष्यात आल्यावर तिने तुषार ला विरोध केला,
त्या मुळे सकाळीच पूनमला खोलीत डांबून पळून गेला, पूनम आत मध्ये डांबून असल्याने तिने शेजारी असणाऱ्या ना मदतीसाठी हाक मारली व मग या खोलीमधून पूनम ची सुटका केली,
सकाळ पासून पळून गेलेला तुषार हा सायंकाळ पर्यंत परत येईल या आशेने पूनम त्याची वाट बघत होती पण तो रात्री पर्यंत परत न आल्याने शेवटी तिने चिमुर पोलीस स्टेशनला तक्रार केली पण नवरा बायकोच भांडण असल्याने त्यांनी तिची रिपोर्ट महिला तक्रार केंद्र वरोरा यांच्या कडे पाठविली मग
कोणाच्या तरी मदतीने आपल्या आईकडे निघून गेली आज ना उद्या आपला नवरा न्यायला येईल यासाठी ती तुषार ची वाट बघत होती,असेच काही दिवस वाट बघण्यात निघून गेले,
घरी कुणावर ओझे बनण्यापेक्षा ती एका ठिकाणी परत कामाला लागली,
मग काही दिवसांनी तुषार हा पूनम ला संपर्क करून आपली सोडचिट्टी झाली नाही आजही तू माझी बायको आहेस आज ना उद्या मी माझ्या आईला समजावतो म्हणून तिच्या विनवण्या करत होता, लग्नाचा नवरा असल्याने पूनम ने ही मोठं मन करून त्याला माफ केल पण या तुषार नावाच्या नराधमच्या मनात काही वेगळंच शिजत होत तो पुनमच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी पुन्हा तिच्या लाडी गोळीने बोलू लागला,
त्या मुळे नवरा असल्याने पुन्हा त्याच्या फसव्या प्रेमात अडकली पुन्हा पूनम आणि तुषार यांच्या भेटी गाठी वाढल्या अश्यातच पूनमच्या वडिलांचे निधन झाल्याने ती स्वतःच्या प्राकृतिकडे दुर्लक्ष करीत होती, मग तिच्या शरीरात
होत असलेल्या बदलामुळे ती तुषार पासून पुन्हा एकदा गरोदर राहिली,
गरोदर असल्याची बातमी पूनम ने तुषार ला सांगितली त्याने त्या वेळेस मी तुला सोडून जाणार नाही असे सांगितले पण नंतर काही दिवसांनी आपला भामटे पणा दाखवायला सुरवात केली आपण गरोदर आहोत हे घरी कळेल तर आईच्या घरी भांडणे होतील म्हणून ती तुषार कडे निघून गेली तेव्हा काही महिने तुषार ने पूनम ला आपल्या मित्राच्या मदतीने एका मैत्रिणीकडे ठेवले, पण गरोदर पणात तो तिची पाहिजे तशी काळजी घेत नसल्याने त्याचा परिणाम पूनम च्या प्रकृतीवर होत होता, अश्या वेळेस तुषार याने पूनम ची संपूर्ण साथ सोडून दिली, व तो बाहेर फक्त उनाडक्या करीत होता, आणि पूनम ला तिच्या तश्या अवस्थेत सोडून दिले होतेगरोदर पणात आपला नवरा सोबत असावा असे प्रत्येक स्त्रीला वाटते पण तुषार सारखे निर्दयी व नराधम फक्त स्त्रीला आपल्या उपभोगची वस्तू समजत असतात,त्यामुळे हा नराधम पूनम ला एकटं तिच्या जीवावर सोडून पळून गेला, या नंतर मोठ्या हाल अपेस्ट सहन करीत समाज व नातेवाईक यांचा तिरस्कार सहन करीत मरणाच्या दारात यातना भोगत
एका गोंडस मुलीला जन्म दिला,पण हा निर्दयी नराधम त्या मुलीला बघायलाच अजून पर्यंत गेला नाही, आत्ता तर तो आपली बाजू सावरण्यासाठी पूनमच्या चरित्र्यावर शिंतोडे उडवत ही मुलगी माझी नाही असे सांगत फिरत आहे, इतकंचे कमी नाही तर या नराधमांने एका मुलीची फसवणूक करून व एका मुलीचा पिता असून आपल्या जातीची मानसिक विकृतीच्या पछाडलेल्या आई वडिलांच्या सांगण्यावरून म्हणण्या पेक्षा स्वतः त्याच दुसरं लग्न करून देत आहेत अश्या कुजक्या मानसिक प्रवृतीच्या लोकांनी लग्न पत्रिका सुद्धा छापल्या असून १८ एप्रिल ला हा नराधम पहिली पत्नी असतांना दुसरं लग्न करून त्या मुलीचे जीवन खराब करण्यासाठी सज्ज झाला आहे पूनम न्यायासाठी आपल्या मुलीच्या हक्कासाठी दारोदारी फिरत आहे, समाजातील बुद्धिवंत समजणाऱ्या व्यक्ती या पूनम ची मदत करण्यासाठी पुढे येतील का? पूनम व तिच्या मुलीला न्याय मिळवून देतील का? तुषार सारख्या नराधम ला कायमचा धडा शिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे नाही तर हा नराधम कित्येक मुलींचे जीवन बरबाद करेल या बाबत जागरूक समाज विचार का करत नाही, वयात आलेली असतांना झाली असेल पूनम ची चूक पण त्या साठी तिला आणि तिच्या मुलीला शिक्षा का? दिनांक १५/०२/२०२३ ला पूनम ने चिमुर पोलीस स्टेशला तुषार बगडे च्या विरोधात तक्रार दिली आहे घटनेच गांभीर्य बघता त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० कलम ४९८(अ ) व कलम ३२३ नुसार गुन्हा देखील दाखल केला आहे

