आठवणीतलं नागपूर – कुछ यादें ,बीते
दिनों की !
नागपूर : मंडळी ! या आठवणींची काय गंमत असते पहा! तुमचे मन जरा निवांत झाले की ह्या लगेच मनाभोवती फेर धरतात, नाही का ? परवा, असाच बसलो असताना, ७० घ्या दशकातले
माझे नागपूर वास्तव्य आणि त्यातील
काही गोष्टी, अवचित आठवून गेल्या !
चला, तुम्हाला पण ती सफर घडवून
आणतो !
—मुख्य गोष्ट म्हणजे ,त्या काळी अगदी साऱ्यांकडे वेळ असायचा ! अन्
मनोरंजनाची साधनं विचाराल तर ,घरात वाचन आणि रेडिओ तर बाहेर ,फिरणं आणि सिनेमा ! याच
कारणांमुळे , मंडळी ,स्त्री असो वा
पुरूष ,एकामेकांकडे बसायला जाणे
ही प्रथाच होती. यामुळे , वेळ तर छान
जायचाच , विचारपूस पण होऊन जायची.
—विद्यार्थी असो किंवा नोकरदार , आज जितके व्यस्त असतात तेवढे
नसायचे ! नोकरी काय तर १० ते ५
आणि विद्यार्थी म्हणजे फक्त शाळाच काय ती रहात असे – ट्यूशन , कोचिंग
इ प्रकार अद्याप सुरू व्हायचे होते !
–प्रत्येकाचेच पायी फिरणे फार व्हायचे. जवळपासची सारी कामं ही
पायीच निपटवली जायची , अंतर
अधिक असेल तर सायकल ! त्यामुळे
वेगळी अशी चालायची कवायद करावी
लागत नसे !
— लहान मोठे घरगुती समारंभ हे घरीच
साजरे होत असत आणि या निमित्ताने
घरी, बऱ्याच लोकांचं येणं होत असे. या
प्रसंगी , आवश्यक ती पाकसिध्दता
घरच्या महिला लीलया ,पार पाडीत !
—त्या जमान्यात म्हणून ७० घ्या दशकात,वेटाळात ,लॅंडलाईन फोन
अगदी मोजक्या घरातच असे अन्
तुम्ही त्यांचा नंबर कुणाला दिला असेल
तर , फोन आला की तुम्हाला बोलावणे
येत असे किंवा निरोप कळविला जाई !
–प्रत्येक घराचा एक फॅमिली डॉक्टर
रहा असे,मग ते ऎलोपेथी चे डाॅक्टर
इंदापवार ,बोधनकर ,कोतवाल किंवा
तत्सम असोत , होमिओपॅथी चे डाॅ.
भोयर असोत किंवा वैद्य धर्माधिकारी
असोत ! घरातील साऱ्यांची दुखणी
हेच बरी करीत !
एकंदर पहायला गेलं तर , जिंदगी काफी सुकून भरी आणि समाधानाची
नाही का ? मागे वळून पाहिलं की हेच
जाणवतं की:
जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो
मकां ,
वो फिर नहीं आते ..
उरतात ,त्या फक्त आठवणी! खरं ना ?




