लोकशाहीच्या लग्नाला यायचं हं..! तुमसरात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

महाराष्ट्र
Share

लोकशाहीच्या लग्नाला यायचं हं..! तुमसरात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

 

तुमसर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टण्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. सद्यःस्थितीत राजकीय पक्षांचा प्रचारदेखील जोरात सुरू झाला आहे. त्याचवेळी निवडणूक आयोग आणि सामाजिक संघटनांकडूनही विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे.

स्थानिक नगरपालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी विविध बॅनर लावण्यात आले आहेत. तर, काही अभिनव उपक्रमही राबविणे सुरू करण्यात आले आहेत. घंटागाडीच्या माध्यमातूनही लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जात आहेत. आता तर शहरात मतदानासाठी अनोखी लग्नपत्रिकादेखील व्हायरल झाली आहे.

१९ एप्रिलच्या लग्नासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या भारतीय नागरिकाला या माध्यमातून मतदानाचे निमंत्रण दिले गेले आहे. भारतीय संविधानाने वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवतीला आणि २१ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकाला सज्ञान म्हणून घोषित केले आहे. आता सज्ञान झालेली ही मंडळी त्यांच्या किंवा पालकांच्या इच्छेनुरूप जोडीदाराशी विवाह करण्यासाठी बोहल्यावर चढण्यास तयार झाली आहेत. त्यासाठी सुरुवात होते ती लग्नपत्रिकेपासून. अशीच एक लग्नपत्रिका सध्या व्हायरल होत आहे. ती

तुमसरात अनोखी लग्नपत्रिका व्हायरल

एका आगळ्यावेगळ्या विवाहाची ! तिच्या लग्नाची तारीखही ठरली आहे आणि वऱ्हाडीही ! अगदी स्थळ आणि वेळही! आता यंदाचे वर्षही तितकेच महत्त्वाचे म्हणजे भारतीय लोकशाहीच्या विवाहाचे आहे. तिच्या वैवाहिक जीवनासाठीचे आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले ‘मी प्रथमतः व अंतिमतः भारतीय आहे’, असे

आग्रहाचे निमंत्रण असून, भारतीय नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव (मतदार) आणि भारतीय संविधानाची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. (लोकशाही) या दोघांचा शुभ विवाह १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल १० तासांच्या प्रदीर्घ वेळेत होणार आहे.

भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी, आपला आवाज संसदेत पाठविण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा, यासाठी हे निमंत्रण अगत्याचे ! आपले एक मत भारताची स्वप्ने

सत्यात उतरविण्यासाठी आहे. या लग्नाचे निमंत्रण आम्ही भारताच्या लोकांनी दिले आहे. तर, आपले विनीतमध्ये कु. निळीशाई व चि. ईव्हीएम यांचा नामोल्लेख आहे. आपले मतदान हाच आमचा आहेर अन् विकसित भारत हेच तुमचे रिटर्न गिफ्ट असणार आहे, असे या पत्रिकेत म्हटले आहे. ही लग्नपत्रिका शहर व परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे, एवढे मात्र खरे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत