आठवले समाजकार्य महाविद्यालय शेडेगाव चिमूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 133 वी जयंती साजरी
चिमूर :- आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे भारतरत्न बोधिरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमाप्रसंगी आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर चे प्राचार्य वडस्कर मॅडम, डॉक्टर खंगार सर, डॉक्टर बन्सोड सर, तसेच महाविद्यालयाचे इतर कर्मचारी यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य वडस्कर मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती दिली. तसेच डॉक्टर खंगार सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर बन्सोड यांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन केले.. अशाप्रकारे महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133 जयंती साजरी करण्यात आली.


