केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर

राष्ट्रीय
Share

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2023 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2023 च्या लेखी परीक्षेचा निकाल, आणि जानेवारी-एप्रिल, 2024 दरम्यान व्यक्तिमत्व चाचणीसाठी झालेल्या मुलाखतींच्या निकालाच्या आधारावर, गुणवत्तेनुसार, पुढील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे:

i.भारतीय प्रशासकीय सेवा;

ii.भारतीय परराष्ट्र सेवा;

iii.भारतीय पोलीस सेवा; आणि

iv.केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’.

1.एकूण 1016 उमेदवारांची नियुक्ती साठी शिफारस करण्यात आली असून त्याचे तपशील पुढील प्रमाणे आहेत:

GENERAL EWS OBC SC ST TOTAL
347

(incl.

07 PwBD-1,

04 PwBD-2,

03 PwBD-3 &

02 PwBD-5)

115

(incl.

01 PwBD-1,     Nil PwBD-2,

01  PwBD-3 & Nil PwBD-5)

303

(incl.

07 PwBD-1,     02 PwBD-2,

01 PwBD-3 & 01 PwBD-5)

165

(incl.

01 PwBD-1,     Nil PwBD-2,

Nil PwBD-3 &

Nil PwBD-5)

86

(incl.

Nil PwBD-1,     Nil PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)

1016

(incl.

16 PwBD-1,      06 PwBD-2,

05 PwBD-3 &

03 PwBD-5)

2.नागरी सेवा परीक्षा नियम 2023 च्या नियम 20 (4) आणि (5) अनुसार, आयोगाने पुढील प्रमाणे उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे:

GENERAL EWS OBC SC ST PwBD-1 PwBD-2 TOTAL
120 36 66 10 04 02 02 240

3.परीक्षेच्या नियमांमधील तरतुदींचा विचार करून, उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्ती केली जाईल. केंद्रसरकार द्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची यादी पुढील प्रमाणे:

SERVICES GEN EWS OBC SC ST Total
I.A.S. 73 17 49 27 14 180
I.F.S. 16 04 10 05 02 37
I.P.S. 80 20 55 32 13 200
Central Services Group ‘A’ 258 64 160 86 45 613
Group ‘B’ Services 47 10 29 15 12 113
Total 474 115 303 165 86 1143*

 

*PwBD अंतर्गत भरली जाणारी 37 रिक्त पदे समाविष्ट आहेत (16 PwBD-1, 06 PwBD-2, 05 PwBD-3 आणि 10 PwBD-5)

4.शिफारस करण्यात आलेल्या 355 उमेदवारांचे अर्ज तात्पुरते राखून ठेवण्यात आले आहेत.

5. युपीएससी च्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉलजवळ एक “मदत केंद्र” आहे. उमेदवारांना त्यांची परीक्षा / भरती याबाबतची कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते 17:00 या वेळेत थेट अथवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर मिळवता येईल. निकाल युपीएससी च्या http//www.upsc.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण उपलब्ध होतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत